उरण दि २(विठ्ठल ममताबादे ) उरण मध्ये शैक्षणिक संस्थेचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. मात्र आता हा प्रश्न मार्गी लागला आहे.स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या हक्काच्या शैक्षणिक संस्थेच्या कामाला गती मिळाल्याने उरणकरांमध्ये मोठा आनंद उत्साह पहायला मिळाला आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लोकनेते दि.बा. पाटील शैक्षणिक संकुलनाच्या उभारणीसाठी विकासक म्हणून शिरढोणकर बंधू यांना संस्थेने शिक्कामोर्तब केल्याने उरणकरांसाठी आधुनिक दर्जेची शैक्षणिक इमारत लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.एका गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी संघटीत झालेली भूमी पुत्रांची प्रकल्पग्रस्तांची हि संस्था आत्ता शेकडो हजारो विद्यार्थ्यांना महाविद्यालय संकुलन उपलब्ध करणार असल्याने एक आदर्श उदाहरण म्हणून या संस्थेकडे पाहिले जाणार आहे .वर्ष २००७ साली अनेक संघर्षातून दिनेश घरत व संतोष पवार यांच्या पुढाकाराने व अन्य प्रकल्पग्रस्तांच्या प्रयत्नाने उरण तालुका प्रकल्पग्रस्त शैक्षणिक व सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली होती.या संस्थेच्या कार्याध्यक्ष पदी माजी आमदार दानशूर मनोहर शेठ भोईर असल्याने उत्तम आर्किटेक्चर ने सोयी सुविधा देणारी भव्य दिव्य संकुलन इमारत उभारावी यासाठी गेली अनेक वर्षे संस्था विश्वस्त कमिटी प्रयत्नशील होती . सामाजिक चळवळीतील नेतृत्वांना ,सर्व पक्षीय नेत्यांना सोबत घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या सहभागातून लोकनेते दि. बा .यांच्या नावाने हे संकुल उभारण्यासाठी आपल्याच समाजातील सक्षम भूमिपुत्र विकासक म्हणून असावा हि भावना संस्थेच्या मनात सातत्याने होती. अश्या वेळी नवी मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक तसेच स्वतः शिक्षक पुत्र , शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवी विजय नामदेव शिरढोणकर व त्यांचे बंधू राजेंद्र शिरढोणकर बंधू यांचा प्रस्ताव संस्थेच्या विश्वस्त कमिटीने मोठया आनंदोत्सवात एकमताने मंजूर केल्याने संस्थेने समाधान व्यक्त केला. या करारा नंतर दसरा सणाच्या शुभ मुहूर्तावर ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी संकुलनाच्या सुरक्षा भिंत उभारणीच्या प्रारंभी हिंदू संस्कृतीतील विधिवत पद्धतीने पूजा ,अर्चना ,नारळ फोडून स्व.दि बा पाटील शैक्षणिक संकुलन अश्या नामफलकाचे अनावरण उद्घाटन करण्यात आले.या शुभ प्रसंगी माजी आमदार मनोहर भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष दिनेश घरत, कार्याध्यक्ष भूषण पाटील, उपाध्यक्ष काशिनाथ गायकवाड, संघटक संतोष पवार, समन्वयक सुधाकर पाटील व अन्य वर्किंग कमिटी व विश्वस्त सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.आधुनिक ,प्रशस्त अश्या वास्तूच्या कार्याला अभिमान वाटेल असे भव्य दिव्य शैक्षणिक इमारतीचे भूमिपूजन लवकरच करू हे स्वप्न माझे वडील मुख्याध्यापक आदर्श शिक्षक स्व. नामदेव पांडुरंग शिरढोणकर यांचे होते आम्ही दोन्ही त्यांचे पुत्र म्हणून ते स्वप्न लवकरच पूर्ण करू या पुण्य कार्यासाठी माझ्या संपूर्ण शिरढोणकर परिवाराने एक दिलाने मंजुरी दिली आहे म्हणून आपण हि आमच्या या कार्यासाठी सहकार्य करावे . भविष्यात प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी परगावी जाण्याची गरज लागणार नाही यासाठी सर्वस्वी प्रयत्न करू असा विश्वास या प्रसंगी उद्योजक विजय शिरढोणकर व राजेंद्र शिरढोणकर यांनी व्यक्त करीत संस्थेचे आभार मानले. यावेळी लोकनेते दि.बा.पाटील यांना अभिवादन करून अमर रहे.. अमर रहे.. दिबा पाटील अमर रहे असा जय घोष करण्यात आला.
संस्थेला आजपर्यंत ज्या ज्या दानशूरांनी मदत केली त्या सर्वांचे हे कार्य कधीही थांबू द्यायचे नाही, या पवित्र कार्यास आपण सर्वांचा सदैव सहकार्य व आशीर्वाद असावा असे ही या निमित्ताने सांगत उपस्थित संस्था सदस्यांनी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत हा अविस्मरणीय असा आनंद उत्सव साजरा केला. यावेळी ०६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनात सर्व भूमिपुत्रांनी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे व नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचेच नाव द्यावे यासाठी सरकारला जागे करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा