उरण दि २(विठ्ठल ममताबादे )सह्याद्री प्रतिष्ठान उरण विभागाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील आवरे येथील मर्दन गडावर दसरा साजरा करण्यात आला.दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सह्याद्री प्रतिष्ठान उरण विभागाने परंपरा जोपासत आवरे येथील मर्दनगडावर दसरा साजरा केला.याप्रसंगी मर्दनगडावरील आई एकविरा मातेच्या मंदिरात देवीची ओटी भरली व पूजन करून महाराष्ट्रावर आलेल्या ओल्या दुष्काळा विरुद्ध लढण्याचे बळ मागितले. इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे अशी विनवणी करण्यात आली. त्यानंतर गडाच्या परिसरात असलेल्या भगव्या झेंड्याचे पूजन केले व शस्त्रपूजन केले. दुर्ग संवर्धन करण्यासाठी सुबुद्धी दे व सर्व दुर्ग सेवकांचे आरोग्य सुस्थितीत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली. सह्याद्री प्रतिष्ठान उरण व मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरे यांच्या संयुक्त विद्यमाने मर्दानगडावर भविष्यात आणखी मोठी कामे करण्याचे संकल्प केला गेला.या प्रसंगी कौशिक ठाकूर,महेश गावंड,सुशील पाटील,प्रितेश कोळी अभिषेक ठाकूर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्री म्हसोबा देवस्थान उत्सवाचे आयोजन
मुंबई (पी.डी.पाटील): मेघवाडी, डॉ. एस्. एस्. राव रोड, लालबाग, मुंबई येथील श्री म्हसोबा मंदिर समिती व मेघवाडीतील रहिवाश्यांच्या वतीने गुरुवा...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा