आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

जी.के.एस .महाविद्यालयाची कु.दीक्षा अर्जुन पाटील हिचा कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक

मुंबई (शांताराम गुडेकर) जिल्हा क्रीडा परिषद रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड आणि पोलिस मुख्यालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विभाग विभागस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२५–२६ सोमवारी (२९ सप्टेंबर २०२५) आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे आयोजक श्री. निळकंठ तुकाराम आखाडे (राज्य क्रीडा मार्गदर्शक) होते.या स्पर्धा पोलिस मुख्यालय, कळंबोली, पनवेल, रायगड येथे संपन्न झाल्या.
           या स्पर्धेत मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान, कनिष्ठ महाविद्यालयातील कुमारी. दिक्षा अर्जुन पाटील इयत्ता १२वी या विद्यार्थिनीने १९ वर्ष वयोगटा खालील स्पर्धात भाग घेऊन ५३ किलो वजनी गटात पहिला क्रमांक मिळविला.या विद्यार्थिनीची महाराष्ट्र राज्य स्तरासाठी खेळाडू म्हणून निवड झाली आहे.महाविद्यालयाच्या संचालिका सौ. कविता शिकतोडे मॅडम तसेच प्राचार्य डॉ.बी.ल.जाधव सर उपप्राचार्य श्री. प्रशांत तांदळे सर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.विकास सावंत सर उपप्राचार्य श्री शफीक शेख सर महाविद्यालयाचे क्रिडा शिक्षक सौ. हर्षला विशे व श्री. बाळाराम चौधरी सर यांनी यानिमित्ताने विद्यार्थिनीचे कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शहापूर तालुक्यातील नडगावं जिल्हा परिषद गटातून हर्षल शेलवले निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

शहापूर (प्रतिनिधी): शहापूर तालुक्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यातील महत्त्वाचं जिल्हा...