मुंबई (सुभाष हांडेदेशमुख): जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि एक हरहुन्नरी शिक्षिका योगिता गणेश हिरवे यांना नुकताच आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२५ येत्या १२ ऑक्टोबर रोजी अंबरनाथ येथे आदर्श रायगड वृत्तपत्राच्या वर्धापन दिनी कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत देण्यात येणार असल्याचे आयोजक आणि कार्यकारी संपादक शैलेश सणस यांनी सांगितले.यावेळी विविध संस्थांना आदर्श सामाजिक संस्था तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.हिरवे मॅडम मागील २५ वर्षापासून कुर्ला येथील पंत वालावलकर माध्यमिक विभागात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी घडविलेले अनेक विधार्थी आज देशात आणि परदेशात विविध ठिकाणी मोठमोठ्या ह्युद्यांवर कार्यरत आहेत.योगिता हिरवे यांना या आधी देखील अनेकवेळा आदर्श शिक्षिका आणि सामाजिक कामासाठी पुरस्कार मिळालेले असून पती गणेश हिरवे यांच्या प्रेरणेने त्या स्वतःला कामात झोकून देतात.त्यांचा आवाज देखील छान असून अनेक कार्यक्रमात त्यांनी सुरेल गायन केलेले आहे.पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्र विद्या विकास मंडळाचे सचिव आणि पंत वालावलकर शाळेचे माजी मुख्याध्यापक आदर्श शिक्षक सत्येंद्र सामंत सरांनी हिरवे मॅडम यांचे विशेष कौतुक केले असून असे मेहनती शिक्षक आमच्या शाळेत असल्याचे पाहून आनंद होत असल्याचे सांगितले.अनेकांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षिका योगिता हिरवे यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गावदेवी चॅरिटेबल शेतकरी संघटना वर्धापन दिन साजरा!
मुंबई (सतिश पाटील): गावदेवी चॅरिटेबल संघटना( दिवे अंजुर भिवंडी ) ही गेली सात वर्ष अनेक उपक्रम राबवित आहेत. भूमिपुत्रांना न्याय म...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा