आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

संस्कारीत बाल-मेनू गरबा-२०२५ या उपक्रमाचे १० वे वर्ष.....

    अश्विन शुक्ल प्रतिपदा ते दशमी पर्यंत नवरात्रीचा उत्सव भारतभर साजरा केला जातो.नऊदिवस कुणी उपवास करतात,तर कुणी अनवाणी चालतात, कुणी एकभुक्त राहतात, तर स्त्रिया नऊदिवस नऊ रंगाच्या साड्या परिधान करतात. त्याचप्रमाणे देवीलाही नऊ रंगांच्या नऊ दिवस साड्या परिधान करीत असतात. विविध ठिकाणी रात्री गरबानृत्य व दांडिया खेळतात. त्यात महिला, पुरूष, तरूण-तरुणी, बालक, वृध्द असे विविध वयोगटातील लोकं सहभाग घेतात. नऊ दिवस नऊ रात्री उत्साह आणि आनंदाने निघून जातात. खरं तर महाकवी कालीदासाने म्हटले आहे कि,"उत्सवप्रियः खलु मनुष्यः।।उत्सवाने उत्साह वाढतो. म्हणून मानवी जीवनामध्ये संसाराच्या गाढ्यातुन क्षणिक मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला ऋषींनी विविध उत्सव (सण) दिलेले आहेत. त्यातील हा एक उत्सव "नवरात्रौत्सव".
नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस.
   आपल्या प्रत्येक कृतीमागे एक अदृश्य शक्तिचा हात असतो. जी आपल्याला दिसत नाही. परंतु त्या शक्तिचा अनुभव येत असतो. त्या शक्तिला नमस्कार करण्याचे दिवस म्हणजे नवरात्री.
   परंतु आज शहरातील नवरात्रौत्सवात विकृती घुसली आहे. भोगवादाला नवरात्रौत्सवातून फाटा फुटत आहे. विकारी दृष्टी विष ओकत आहे. अस्लीलता निर्भयतेने नाचतांना दिसते. अस्लीलतेवर निर्बंध घालणारेही अस्लीलतेचे शिकारी होत आहेत. वयात आलेली मुलगी किंवा मुलगा या नवरात्रौत्सवातूनच भोगांचे शिकार होतांना दिसतात, अमर्याद विषय-वासना सैरावैरा पळतांना दिसतात. हे सर्व सर्वांनाच माहिती आहे. परंतु सर्वजण परिस्थितीचे आणि भोगांचे गुलाम झालेले आहेत. "कुंपनच शेत खाऊ लागलंय...."मग धाव घ्यायाची कुणाकडे? हिंदु म्हणून गर्वाने म्हणतो ना? मग हिन्दु उत्सवातली ही विकृती थांबवूया ना?थांबवू नाही शकत तर, कमीत कमी त्या विकृतीचे शिकार तरी नको होऊया.

विकृती दर्शनातून केला मी संस्कृतीचा उगमः

    वर्षानुवर्षांच्या ह्या चिंतनातून मी छोटासा प्रयोग केला..नवरात्री उत्सवाला दिलं एक विधायक वळण आणि साकारला एक नविन परंतु आगळा वेगळा "संस्कारीत बाल-मेनू गरबा" हा उपक्रम.

      संस्कारीत बाल-मेनू गरबाः

       २०१६ ला केवल चार घरांपुरताच सीमित असलेला "संस्कारीत बाल मेनू गरबा"हा उपक्रम. आजही या क्रांतिकारी उपक्रमात आम्ही १५ ते २० मुलांमध्ये नऊ रात्री रोज घरातच गरबा खेळत आहोत.पहिला वर्ष फक्त गरबा व दांडीया खेळलो. नंतर दुसऱ्या वर्षी मात्र विविध स्पर्धा घेतल्या. चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा इ.त्यात शेवटच्या दिवशी बक्षिस सामारंभही ठेवला. यापुढे एक एक नविन गोष्ट आम्ही सदर उपक्रमात राबवत असतो. त्याचा परिणाम मुलांच्या बुध्दीमत्तेवर होतो. हा एक संस्काराचाच भाग आहे. शेवटच्या दिवशी बक्षिस समारंभासाठी शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेले मान्यवर (गेस्ट) बोलावून त्यांच्या शुभहस्ते बक्षिस समारंभ व मोलाचे मार्गदर्शन अशाप्रकारे समारोह करतो. या वर्षी खिडकाळी गावातील बनलेली पहिली डॉ.सिध्दी दिपक पवार हिंस प्रमुख अतिथी म्हणून बोलावली होती. डॉ.सिध्दी पवार हिने बालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.शेवटी डॉ.सिध्दीच्या शुभहस्ते बालकांना बक्षिस देऊन सन्मानीत करण्यात आले. गरबा king-कु.क्षितीज योगेश पाटील व गरबा Queen -कु.मनस्वी विकास जाधव यांनी यावर्षीचा मान पटकावला. इतर खेळांसाठी व सहभागी बालकांनाही बक्षिस देऊन सन्मानीत केले.या उपक्रमातली विशेष गोष्ट म्हणजे रोज गरबा खेळतांना मध्यभागी तेजस्वी 'पेटता घट' ठेवुन त्याभोवती आम्ही सर्व गरबा किंवा दांडिया खेळतो. तात्पर्य आमच्या प्रत्येक कृतीच्या मध्यभागी जगदंबा माता म्हणजे चिद् घन शक्ति असते. हा भाव समजावण्यासाठी आम्ही मुलांना सांगतो कि,आपण सर्व जगदंबा मातेच्या भोवताली फिरत असतो. आपले भरण-पोषण ही जगदंबा माताच करते. म्हणून जगदंबा मातेला नमस्कार केल्याशिवाय भोजन करायचं नाही. सकाळी उठल्यावर व रात्री झोपतांनाही जगदंबेला नमस्कार करायचा. अशाप्रकारे आई जगदंबेवर प्रेम निर्माण करणारी नवरात्र साजरी करू लागलो. त्याजबरोबर रोजचा एक नविन मेनू बनवून प्रसाद समजुन ग्रहन करू लागलो. प्रसाद घेतांना माता जगदंबेला (घट) मध्यस्थ ठेवून संस्कृत श्लोकाने नमस्कार करू लागलो. नऊ रात्री नऊ मेनू बनवुन त्या नावाने गरबा साजरा करू लागलो. जसे कि,"पावभाजी गरबा."
    वर्गणी काढून नवरात्रौत्सव साजरे करणाऱ्या,डि.जे.बँन्ड यांच्या तालावर नाचणाऱ्या व त्यांनाच केन्द्रस्थानी ठेवून गरबा खेळणाऱ्या आजच्या नवरात्रौत्सवांपेक्षा आमचा संस्काराला उजळणी देणारा, हिंदु धर्माला शोभेल असा, संस्कृतीला जपणारा छोटासा "संस्कारीत बाल-मेनू गरबा" हा उपक्रम आम्हाला अधिक प्रिय वाटू लागला आहे. यावर्षीही आम्ही 'संस्कारित बाल -मेनू गरबा' यशस्वीपणे साजरा केला.

सदर उपक्रमाची 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद'-पुणे या नामांकित संस्थेने नोंद घेऊन २०२२ मध्ये राज्यस्तरीय 'पी.सावळाराम समाजरत्न पुरस्कार' प्रदान करून सन्मान केला.सदर सन्मान हा संस्कृतीचा होता.

*_👉येथे लौकिक दृष्टीने सजावटीचा झगमगाट नाही...परंतु संस्कारांची चमक आहे._*

*_👉मंडप,विजेची रोषणाई नाही.परंतु बालकांच्या आनंदाचा प्रकाश आहे._*

*_👉वर्गणीतून मिळालेल्या वस्तू नाहीत..परंतु मेहनतीतून मिळणाऱ्या बक्षिसांचा खजिना आहे._*

*_👉डि.जे. बँड यांचा कर्कश आवाज नाही.परंतु देवीच्या मंत्रोच्चारांचा जयघोष आहे._*

*_👉प्रत्येक्ष दुर्गामातेची मूर्ती नाही..परंतु जगदंबा मातेचे अस्तित्व मात्र आहे._*

 👉 उपक्रमाचा मुख्य हेतूः

        नविन पिढीतील बालके सध्याच्या उत्सवांमधील विकृतीचे व कर्मकांडाचे शिकार बनू नये व उत्सवामधील खरा अर्थ समजुन उत्सवप्रेमी बनावी. हा मूलभूत हेतू  ठेवून "संस्कारीत बाल-मेनू गरबा" हा उपक्रम सूरू केला आहे.
-----------------------------
        एक साहित्यिक
नवनाथ एकनाथ ठाकुर-खिडकाळी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गावदेवी चॅरिटेबल शेतकरी संघटना वर्धापन दिन साजरा!

मुंबई (सतिश पाटील): गावदेवी चॅरिटेबल संघटना( दिवे अंजुर भिवंडी ) ही गेली सात वर्ष अनेक उपक्रम राबवित आहेत. भूमिपुत्रांना न्याय म...