आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

कोजागरी पौर्णिमा

  अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते. या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री ('को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. कोण जागे आहे याचा मतितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते. 
     आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला आयुर्वेदात अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे. या रात्री 12 वाजेनंतर अमृत पाझरत असल्याने त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असे मानले गेले आहे.
     खगोलशास्त्रदृष्ट्या कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो आणि त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याने कितीतरी औषधींचे सेवन या रात्री केल्यास त्याचा फार उपयोग होत असल्याचे सांगीतले आहे.
     अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दुध आटवुन त्यात केशर आदी मसाला घालुन ग्रहण केल्यास आरोग्यास खुप लाभ मिळत असल्याने या दुधसेवनाचे देखील फार महत्व आहे. एका संशोधनानुसार दुधात लॅक्टिक आम्ल आणि अमृत तत्व असतं हे तत्व चंद्राच्या किरणांमधुन अधीक मात्रेत शक्ति खेचण्याचे काम करतं. एकुणच ही प्रक्रीया विज्ञानावर आधारीत आहे.
म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा सण साजरा करतात.

कोजागिरी पौर्णिमेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.🥛


(माहिती संकलन - इंटरनेट)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गावदेवी चॅरिटेबल शेतकरी संघटना वर्धापन दिन साजरा!

मुंबई (सतिश पाटील): गावदेवी चॅरिटेबल संघटना( दिवे अंजुर भिवंडी ) ही गेली सात वर्ष अनेक उपक्रम राबवित आहेत. भूमिपुत्रांना न्याय म...