आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

सुप्रसिद्ध गायक ,ऑर्केस्ट्रा स्टार संतोष पाटील “वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी ”तर्फे या वर्षीचा गायन व संगीत क्षेत्रातील मानद विद्या वाचस्पती पुरस्काने सन्मानित

गडब (अवंतिका म्हात्रे ) दि.४ ऑक्टोबर रोजी गणपतीचे माहेरघर असणाऱ्या पेण येथील सुप्रसिद्ध गायक ऑर्केस्ट्रा स्टार संतोष पाटील यांना राजधानी नवी दिल्ली येथे गायन व संगीत सेवेत विशेषतः ग्रामीण भागात भारतीय आणि आधुनिक संगीतामधील त्यांचे कार्य व त्यांच्या १६ व्या वर्षांपासून भारतीय व आधुनिक संगीतातील ३५ वर्षांच्या कार्याची तसेच त्यांनीआजवर केलेल्या संगीत प्रसार या सर्व कार्याची दखल घेऊन वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी तर्फे या वर्षी ची गायन व संगीत क्षेत्रातील मानद विद्या वाचस्पती ही उपाधी देऊन गौरव करण्यात आला..
      गेले सहा महिन्यांपासून हि नामांकन प्रक्रीया सुरु होती..या करीता माझ्या सौशल मीडीया वरील फौलोअर्सचे खूप मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले .त्यांनी हा पुरस्कार त्यांचे वडील वै.ह.भ.प. बाळाराम महाराज पाटील आणि मातोश्री वै. ह.भ.प रूक्मिणी पाटील यांना समर्पित करीत आहे... असे पत्रकारांशी बोलताना सांगितले .
     गेली ३५ वर्ष त्यांनी आपल्या गायनाने संपूर्ण रायगड जिल्ह्याला मंत्रमुग्ध केले आहे . त्याच मेहनतीची ही पोच पावती त्यांना मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ज्येष्ठ समाजसेविका वैशाली सुरेश कांबळे राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित

मुंबई (प्रतिनिधी ) सिडको येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात उपलेखापाल पदावर काम करत सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून अह...