शहापूर (प्रतिनिधी): शहापूर तालुक्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यातील महत्त्वाचं जिल्हा परिषद गट अशी ओळख असलेल्या नडगाव जिल्हा परिषद गटातून महाराजा सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष हर्षल शेलवले अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा यशस्वी ठसा उमटविणाऱ्या शेलवले यांचे सर्व स्तरावरील नागरिकांशी चांगले संबंध असल्याने त्यांना विविध मंडळ, संघटना,राजकीय कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते जाहीर पाठिंबा देत आहेत.
राजकीय वर्तुळात मात्र शेलवले यांना कोणत्या राजकीय पक्षातून संधी मिळणार यावर चर्चा रंगली आहे. यासंदर्भात त्यांचे सहकारी दिपकजी पवार (नडगाव)यांच्याशी संपर्क साधला असता राजकीय पक्षातून संधी मिळाल्यास आनंदच असेल मात्र न मिळाल्यास अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सांगत आम्हाला अपक्ष असल्यासही जनता आमच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा