आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

फेस्कॉमचा जीवन गौरव पुरस्कार नटवर्य प्रशांत दामले यांना जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख): महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबई प्रादेशिक विभागाचे ८ वे द्वैवार्षिक अधिवेशन ७ नोव्हेंबर २०२५ रोजी विष्णूदास भावे नाट्यगृह वाशी येथे सकाळी ९ तें २ या वेळात संपन्न होणार आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील व भारतातील ज्येष्ठ मान्यवर नागरिक उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचे आंनदी जीवन व आरोग्य या विषयातील तज्ञ् मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी लागणारी आवश्यक माहिती व काही उपयुक्त लेखन छापण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.
    या अधिवेशनात अभिनेते "सुख म्हणजे नक्की काय असते" फेम मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेते, विनोदी कलाकार प्रशांत दामले यांना, फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाच्या या अधिवेशनात जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. फेस्कॉम मुंबईचे अध्यक्ष सुरेश ईश्वर पोटे यांनी प्रसिद्धी पत्रिकेद्वारे कळवले आहे. प्रवेशिकेसाठी ९३२२४०१९६५ नंबर संपर्क करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पेण येथे दोन दिवसीय रेकी शिबिराचे आयोजन

पेण (प्रतिनिधी): वैश्विक उर्जेद्वारे स्वतःला शक्तीमान बनवा, मनोवांच्छित मिळवा. 'रेकी' हा जापनीज शब्द आहे. 'रे' म्हणजे '...