आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

गावदेवी चॅरिटेबल शेतकरी संघटना वर्धापन दिन साजरा!

मुंबई (सतिश पाटील): गावदेवी चॅरिटेबल संघटना( दिवे अंजुर भिवंडी ) ही गेली सात वर्ष अनेक उपक्रम राबवित आहेत. भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी सतत कायदेशीर लढणारी संघटना. बुलेट ट्रेन प्रकल्पात भूमिपुत्रांना योग्य मोबदला मिळवून दिला. कोरोना काळात कम्युनिटी किचन द्वारे दररोज तीन चारशे लोकांना जेवण वाटप केले होते. अलिबाग कॉरिडॉर संदर्भात सरकारी कार्यालयात सतत पाठपुरावा सुरू आहे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले आहे. गावातील भूदान जमीन संदर्भात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दि.बा. पाटील साहेब विमानतळ नामकरण आंदोलन असो टोरंट विरोधात आंदोलन असो एम एम आर डी तोडक कारवाई असो.भ्रष्टाचार विरोधात कार्य असो,रस्त्यांची समस्या याबाबत वेळोवेळी कागदोपत्री नोंद घेऊन जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतात.
      अनेक प्रश्न संघटने मार्फत पार पाडत आहेत. जिथे अन्याय तिथे न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कार्य करीत आहे. गावाचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास हा संघटनेचा ध्यास आहे.यासाठी संघटनेचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष तसेच सभासद वेळ पडल्यास स्वखर्चाने मदत करीत असतात.संघटनेचे पुढील स्वप्न व प्रयास आहे फक्त दिवे अंजुर, भिवंडी पर्यंत मर्यादित समाज कार्य न करता सर्व पंचक्रोशीत संघटनेची शाखा बनवून कार्यभार वाढवण्याचा मानस आहे प्रत्येक गावाची विकास हा ध्यास आहे.आज गावाबाहेरील समाजकार्य करणारे मंडळातील प्रतीनीधी यांना निमंत्रित केले होते होते प्रत्येकाने आपले आपली अडचण व मत मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच संघटने कडून आलेल्या पाहूण्यांचा सन्मानचिन्ह, शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यात हुशार विद्यार्थी, वकील, डॉक्टर, समाज सेवक, सैनिक,पत्रकार असे उपस्थित होते. तसेच महीला बचत गट यांना मिक्सरग्राॅन्डर भेट देण्यात आले.तसेच दिव्यांग व्यक्तींना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गावदेवी चॅरिटेबल शेतकरी संघटना वर्धापन दिन साजरा!

मुंबई (सतिश पाटील): गावदेवी चॅरिटेबल संघटना( दिवे अंजुर भिवंडी ) ही गेली सात वर्ष अनेक उपक्रम राबवित आहेत. भूमिपुत्रांना न्याय म...