आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५

गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे यांना छत्रपती शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार , ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र जाधव यांना भारतीय संविधान सन्मान पुरस्कार ,तर ज्येष्ठ समाजसेविका वैशाली कांबळे, सहकार तज्ञ प्रशांतकुमार शेवरेगार व,गुणवंत कामगार भरत खांडेकर " राष्ट्र सेवा सन्मान पुरस्काराने" सन्मानित..

मुंबई ( प्रतिनिधी) कोल्हापूरचे सुपुत्र व राज्य गुणवंत कामगार ेेअसोसिएशन चे मुंबई जिल्हाध्यक्ष गुणवंत कामगार, विशेष कार्यकारी अधिकारी प्रभाकर तुकाराम कांबळे यांना सन 2025 चा " छत्रपती शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार " सम्यक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सहदेव जाधव यांना "भारतीय संविधान सन्मान पुरस्कार " ज्येष्ठ समाजसेविका वैशाली सुरेश कांबळे ,सहकार तज्ञ प्रशांतकुमार शेवरेगार, गुणवंत कामगार भरत खांडेकर यांना "राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार " कोल्हापूरीं फेटा , सन्मानचिन्ह व आयएसओ प्रमाणपत्र प्रसिद्ध अभिनेते संजय मोहिते श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर उद्योजक संजय तासकर ब्रिगेडियर सुधीर सावंत ,विसावा आश्रम च्या संस्थापिका स्वातीताई तायडे आदीं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथील शाहू स्मारक नाट्यगृहात आयोजित महाराष्ट्राच्या हिता साठी ,सर्वांच्या सेवेसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त "मराठी पाऊले पडते पुढे*गौरवगाथा सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात महाराष्ट्राच्या हितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा प्रा.डॉ. बी एन खरात यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला 
     त्यावेळी वरील विलोभनीय कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करणारे येत आहे.  जय मल्हार सामाजिक संस्था बलुतेदार महासंघ, वेद फाउंडेशन इचलकरंजी ,संकल्प सेवा फाऊंडेशन , जिद्द फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाला उद्योजक एन जी खरात बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष यशवंत शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर डॉ. राजेंद्र शिंदे इचलकरंजी नम्रता माने कोल्हापूर गीतांजली ठोंबरे कोल्हापूर नम्रता पाटील बुलढाणा धनराज वानखडे अकोला भालचंद्र उसगावकर गोवा आदी मान्यवरांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली असून कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच निस्वार्थपणे राष्ट्र उभारणीसाठी करीत असलेल्या वैभवशाली कार्याच्या सन्मानार्थ महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी मोलाची भर घालणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर शाबासकीची थाप पुरस्काराच्या माध्यमातून देण्यात आल्याचे कामगार नेते व गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शहापूर तालुक्यातील नडगावं जिल्हा परिषद गटातून हर्षल शेलवले निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

शहापूर (प्रतिनिधी): शहापूर तालुक्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यातील महत्त्वाचं जिल्हा...