आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

भांडूपगावात मोफत आरोग्य शिबीर

मुंबई: सार्वजनिक पूजा समिती, भांडूपगाव या संस्थेतर्फे प्रतिवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या संस्थेचे ७६ वे वर्षे आहे. या दीपोत्सवाच्या निमित्ताने संस्थेने शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर, २०२५ रोजी मोफत त्वचा रोग व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन स्व. दिना बामा पाटील रंगमंच, भांडूपगाव येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी फोर्तीस हॉस्पिटल, मुलुंड यांच्या सौजन्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मंजुषा कुरुवा, त्वचारोग तज्ञ आणि त्यांच्या टीमने रुग्णांची तपासणी करून संस्थेला साह्य केले. या शिबिराचा १५० लोकांनी लाभ घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. परशुराम कोपरकर यांच्या हस्ते डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव धनंजय म्हात्रे, कार्याध्यक्षा रजनी पाटील, खजिनदार महेश पाटील, उत्सव समितीच्या अध्यक्षा ममता उलवेकर, सचिव दिनेश कोपरकर तसेच वर्षा वाघिलकर, सोनम कोपरकर, सरिता म्हात्रे, उमा मळेकर, उषा काकडे, प्रवीण पवार, डॉ. देविदास केनी, हेमा भोईर, स्मिता मिसाळ, विजय कडव, प्रशांत काकडे, हेमंत वाघिलकर, दिनेश कोपरकर, संजय उलवेकर, प्रविण पवार, दयानंद पवार, प्रमिला कोपरकर, राहुल खराटे, रजनी पाटील, सृष्टी वाघिलकर, वर्षा वाघिलकर, दीपाली पाटील, सरिता म्हात्रे, भारती किनी, चारुशीला पाटील, विशाखा भोईर, राजेंद्र गावकर, पल्लवी खारकर, प्रमिला कोपरकर, स्मिता मिसाळ, आदि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्वागत दिवाळी अंकाचे

स्वागत दिवाळी अंकाचे छायांकित दिवाळी अंक २०२५ (पोस्टमन) मराठी साहित्य क्षेत्रात प्रथमच "पोस्टमन" या विशेष व्यक्तिमत्त्...