आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

नवरात्रौत्सवात "भारत मातेची" स्थापना ; भांडुप मधील अंबाजी दर्शन सोसायटीची "राष्ट्रीय नवरात्रीची" आदर्श संकल्पना

मुंबई (प्रेम पंडित): मुंबईतल्या भांडुप पश्चिम भागात नॅशनल स्कूल लेन ,भट्टीपाडा, येथे "अंबाजी दर्शन" नावाची सोसायटी आहे. त्या सोसायटीत झाले अनेक वर्ष नवरात्री खूप वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते.. या सोसायटीतील सदस्य भारत मातेच्या मूर्तीची स्थापना करून नऊ दिवस त्या मूर्तीची यथा सांग पूजा करतात. देवीचा उत्सव म्हणजेच भारत मातेच्या स्वातंत्र्याचा उत्सव याच भावनेने या सोसायटी तील रहिवाशी राष्ट्रीय नवरात्र साजरा करतात. भारताच्या नकाशाची पार्श्वभूमी देऊन या धार्मिक उत्सवाचे रूपांतर उदात्त अशा देशप्रेमाशी जोडून हा श्रीमंत विचार नव्या पिढी पर्यंत पोहचवत आहे.
        भारत मातेची स्थापना करून या नवरात्री उत्सवात खऱ्या अर्थाने भारत माता हीच खरी दुर्गा आहे तीच काली आहे तीच अंबा आहे. हा संदेश देतात.
     नवरात्र अशा श्रद्धेय देशभक्तीने त्यांची सोसायटी साजरी करतात. हीच गोष्ट जर पूर्ण भारतात गिरवल्या गेली तर फक्त २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट च्या दिवशी भारत मातेचे स्मरण नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवस दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने होईल. मेरे वतन के लोगो जरा आख में भर लो पाणी, जो शहीद हूये उनकी याद करो कुरबानी या गीताचे सतत स्मरण होत राहील..आपल्या देशासाठी,  ज्यांनी या मातीत स्वतःच्या प्राणाची आहुती दिली.त्याच भारत मातेच्या रक्षणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना मनामनामध्ये निर्माण होईल.
       भारत मातेच्या मूर्ती पूजनाची प्रथा झाले नऊ वर्षा पासून ही संकल्पना राबवली जात आहे. भांडुपचे विख्यात शिल्पकार प्रदीप शिंदे यांची ही कल्पना सोसायतील सदस्यांना आवडली..कलावंत नेहमीच वास्तवाशी जोडला गेला असतो. तो विचारवंत असतो. प्रदीप शिंदे यांनीच ती मूर्ती तयार केली, त्याला डेकोरेट केलं आणि त्या सोसायटीने एक नवा विचार अध्याय दिला की, भारत माता हीच खरी दुर्गादेवी आहे. हाच मोठा विचारांचा बदल या सोसायटीने घडवून आणला आहे..
    वृत्तपत्र किंवा वृत्त वाहिन्यांना अशा उदात्त गोष्टी न दिसता फक्त साड्यांच्या रंगांचे प्रदर्शन करणारे फोटो छापून नवरात्री साजरी करतात..खरे तर वृत्तपत्राने अशा राष्ट्रीय विचारांची दखल मोठ्या प्रमाणावर घ्यायला हवी होती...पण चांगल्या गोष्टीकडे फार कुणाचे लक्ष जात नाही..हेच खरे शल्य..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या

दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...