आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस(ए.ए.)कल्याण आंतरसमूह तर्फे जनहितार्थ उपक्रम

कल्याण : अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस कल्याण आंतर समूह तर्फे एक ऑक्टोबर रोजी मद्य पीडित लोकांपर्यंत ए ए चा संदेश देण्यासाठी जनजागरण स्टॉल सकाळी 09 ते 01 या वेळेत ठेवण्यात येणार आहे. तसेच हा जनहितार्थ उपक्रम महाराष्ट्रातील इतर जिल्हा, तालुका, गाव या ठिकाणी जास्तीत जास्त शासकीय/खासगी हॉस्पिटलमध्ये राबविला जाणार आहे. स्टॉल वर उपस्थित ए ए सभासद 'मद्यपाश आजार' आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असलेला ए.ए. चा सुधारणा कार्यक्रम याबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तसेच याची मोफत माहितीपत्रके वाटप करणार आहेत.अधिक माहितीसाठी ए. ए. कल्याण आंतर समूह क.डों.महानगरपालिकेचे महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र, रिजन्सी अवेन्यू, सिंडिकेट, मुरबाड रोड,कल्याण (प.) येथे किंवा मोबाईल क्र. 9323485476 वर संपर्क करावा असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या

दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...