आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान उरण विभागतर्फे श्रीदुर्गामाता दौडचे आयोजन

उरण दि २१(विठ्ठल ममताबादे )श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेतर्फे प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी तसेच समाजात श्रीशिवछत्रपती धर्मवीर श्रीशंभुछत्रपती या पिता-पुत्रांच्या विचारांचा हिंदू समाज निर्माण व्हावा असा आशिर्वाद श्री तुळजा भवानीच्या चरणी मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गावो-गावी पहाटे ०६:०० वाजता श्री दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात येते. हया वर्षी सुद्धा उरण शहरात तीन दिवस श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.
     सोमवारी दि २२/९/२०२५ रोजी विमला तलावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते देऊळवाडी मार्गे कोटनाका जरी मरी मंदिर पर्यंत व तिथून परत गणपती मंदिर, विमला तलाव, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे समाप्ती तर रविवार दि २८/०९/२०२५ रोजी विमला तलावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते श्री राम मंदिर गणपती चौक मार्गे एन आय हायस्कूल मार्गे नागाव जरी -मरी आई मंदिर पर्यंत व तिथून परत विमला तलावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ समाप्ती तसेच दसऱ्याच्या दिवशी गुरुवार दि. २/१०/२०२५ रोजी विमला तलाव श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते कामठा रोड मार्गे उरण बस टॉप समोर डाऊर नगर श्री घोरबा देवी माता मंदिर पर्यंत व तिथून राजपाल नाका , गणपती चौक मार्गे विमला तलाव श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ समाप्ती असे एकूण तीन दिवस श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.तरी श्री दुर्गामाता दौड साठी मोठया संख्येने शिवभक्त,दुर्गामाता भक्त येणार असून या श्री दुर्गामाता दौडमध्ये नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उरण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई दि. २ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परिचय मेळावा समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष...