ठाणे : रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी खिडकाळीमध्ये 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या संकल्पनेतून इयत्ता ५ वी.ते १२ वी.च्या विद्यार्थ्यांनी एक 'FUN FAIR' साकारले होते. सदर कार्यक्रम म्हणजे एक उत्सवच.! यात खाद्यपदार्थ व खेळ असे एकुण १५ स्टॉल मांडले होते. साधारणतः४० -५० विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. पाणी पूरी, नुडल्स, मंच्युरियन, मोमोज, मसाला पापड, मॕगी, फ्रेंड फ्राईज, पिज्जा, मोजीटो, मिसल पाव, पनीर पकोडे, वडा पाव, ब्रेड चिल्ली, चना भेल, पॕटीस इ. खाद्यपदार्थ व खेळांचेही स्टाॕल मांडले होते. हे बनवण्यात विद्यार्थ्यांचाच सहभाग होता.
७-८ वर्षापासून खिडकाळी गावात 'TALENT CLASS' मधील विद्यार्थ्यांच्या बुध्दित शिक्षणासोबत व्यावसायिक ज्ञानाची भर पडावी म्हणून प्रो.राजन पाटील यांनी केलेला हा अनोखा प्रयोगच म्हणावा लागेल. या 'FUN FAIR' उत्सवाचा आनंद घेण्यासाठी खिडकाळी गावातील ग्रामस्थांनीही भेटी दिल्या. तसेच 'धवलारीन... एक आगरी पुरोहित' या पुस्तकाचे लेखक अर्थात् प्रसिध्द साहित्यिक नवनाथ ठाकुर यांनीही सदर उत्सवास सदिच्छा भेट दिली व सर्व स्टाॕलवर जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांचे मनभरून कौतुक केले तसेच विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद ही घेतला व 'TALENT CLASS' चे प्रो. राजन पाटील व प्रा.किर्ती पाटील यांस शुभेच्छा देऊन दोघांचे अभिनंदन केले.
साहित्यिक नवनाथ ठाकुर यांनी 'FUN FAIR' हा उत्सव पुढील वर्षी गावदेवी मंदिरात मोठ्या प्रमाणात साकारित करायचे असेही सांगितले.'FUN FAIR' उत्सव हा सर्व शाळांमध्ये साकारला जावा अशीही इच्छा त्यांनी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा