मुंबई प्रतिनिधी( सुभाष हांडे देशमुख)जोगेश्वरी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि पत्रकार गणेश हिरवे यांना नवंक्षितिज ट्रस्ट यांच्या वतीने दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी गोरेगाव येथील नंदादीप शाळेच्या ऑडिटोरियम मध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठेचा महारष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित येणार असल्याची माहिती ट्रस्ट चे आधारस्तंभ संस्थापक सुनील कुमरे यांनी दिली आहे.यावेळी महाराष्ट्रातील निवडक १६ पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव होणार आहे. हिरवे यांचे काम चांगले असून नेहमीच ते सामजिक कार्यात दंग असतात.आतापर्यंत त्यांना विविध संस्थांनी त्यांच्या कार्याचा सन्मान करीत त्यांना १२९ पुरस्कार मिळालेले असून आजही त्यांचे काम सुरळीतपणे सुरूच आहे.आजपर्यंत तळागाळातील विविध विद्यार्थी, वंचित कुटुंब, रोजंदारीवर काम करणारे, गोर गरीब यांना मदत करण्यासाठी ते कायमच पुढाकार घेताना दिसतात.आतापर्यंत त्यांनी ३६ वेळा रक्तदान आणि १७ वेळा प्लेटलेट्स डोनेट केले असून मृत्यूपश्चात देहदान अवयवदान देखील ते करणार आहेत.विद्यार्थीप्रिय आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांना समाजात मान असून २५ वर्षांपासून वृत्तपत्र लेखक व पत्रकार म्हणून देखील ते कार्यरत आहेत.कारोना काळात देखील त्यांनी उल्लेखनीय काम केलं होत.अनेक नागरी समस्या देखील पुढाकार घेऊन ते सोडवित असतात.पुरस्कार जाहीर झाल्याने अनेकांनी हिरवे गुरुजींचे अभिनंदन केलं असून त्यांना पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.अशा व्यक्तींचा समाजाला अभिमान असल्याचे सचिव धर्मराज तोकला यांनी सांगितलं.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
छावा संस्थेकडून वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम
पेण ( पी.डी.पाटील) सोमवार दि. ३० जून २०२५ रोजी छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संघटना यांच्याकडून ...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
ठाणे : रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी खिडकाळीमध्ये 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या सं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा