आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

साईनाथ गावंड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

उरण दि २१(विठ्ठल ममताबादे )लायन्स इंटरनॅशनल जिल्हा ३२३१-अ-४ मार्फत उरण तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षकांचा 
शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी स. ९.३० वा. उरण नगरपरिषद शाळा क्र.१/२ येथे शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबरोबरच सामाजिक योगदानाने समाज उजळविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला."उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार" सोहळा कार्यक्रमासाठी उरण तालुक्यातील जे.एम. म्हात्रे प्राथमिक शाळा मोरा येथील साईनाथ रामदास गावंड यांची निवड करण्यात आली.
              शाळेमध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांमध्ये प्रगती व्हावी किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावं म्हणून सेवा संयोग फाउंडेशन मुंबई यांच्याशी संपर्क साधला. व या संस्थेकडून जवळजवळ १५ वर्ष त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स, चित्रकला वही अशा प्रकारचे साहित्य दरवर्षी त्यांच्या प्रयत्नतुन मिळत राहिल्या. तसेच भारतीय स्टेट बँक उरण यांच्याकडून सन २०११-१२ साली शाळेसाठी एक एक्वागार्ड व संगणक मिळवून घेतला. तसेच दहागाव परिसरामध्ये देखील बँकेकडून एक्वागार्ड मिळवून सर्व पूर्व भागातील शाळांना वाटप करण्याचा सहकार्य केले. पुढे सेवा संयोग फाउंडेशन कडून १२ लाख किमतीचे सोलर पॅनल ची मागणी करून सोलर पॅनल शाळेसाठी बसवून घेतला. तसेच विद्यार्थ्यांसाठी सेवा सेवक फाउंडेशन कडून प्रयोगशाळा बनवून घेतली.
           दरवर्षी पहिली ते दहावी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना वडिलांच्या नावाने बक्षीस देत असतात तसेच काही शाळांना देखील अशाप्रकारे ठेव ठेवून बक्षीसंच वाटप करत असतात. श्री रामदास गवत्या गावंड कला, क्रीडा, सामाजिक संस्था आवरे यांच्या माध्यमातून पूर्व विभागातील सर्व शाळांना शैक्षणिक साहित्यात दरवर्षी वाटप करत असतात. तसेच बऱ्याच शाळांना स्पीकर देखील देण्यात आलेलं आहे.ते रायगड जिल्हा खाजगी कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे वेगवेगळे उपक्रम घेऊन त्यांना उपक्रमशील बनवत असतात. शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपतात या सर्व गोष्टींचा विचार करून साईनाथ रामदास गावंड यांना लायन्स इंटरनॅशनल क्लब यांच्यावतीने संगीता माने प्रशासन अधिकारी, उरण यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी लाईन्स क्लब ऑफ उरणचे एमजेएफ लायन्स संजीव सूर्यवंशी जिल्हा प्रांतपाल यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. 
         कार्यक्रम प्रसंगी लायन नीलिमा नारखेडे जिल्हा सभापती( शिक्षक गौरव समारंभ ) यांनी आपल्या मार्गदर्शनपर शब्दांमध्ये एमजेएफ संजीव सूर्यवंशी जिल्हा प्रांतपाळ यांच्या कार्याबद्दल माहिती दिली व लायन्स इंटरनॅशनल क्लब बद्दल थोडक्यात सांगितली. एमजेएफ लायन डॉ. साहेबराव ओहोळ अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ उरण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
             या कार्यक्रम प्रसंगी लाईन्स इंटरनॅशनल क्लब ऑफ उरणचे एमजेएफ संजीव सूर्यवंशी जिल्हा प्रांतपाल, एमजेएफ लायन चंद्रकांत ठक्कर, एमजेएफ लायन सदानंद गायकवाड, लायन नीलिमा नारखेडे जिल्हा सभापती, लायन ज्ञानेश्वर कोठावदे,एमजेएफ लायन दीपक पाटील, लायन अंशू पाल, एमजेएफ लाईन डॉक्टर साहेबराव ओहोळ, प्रवक्ता आशिष कुमार केदार व सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक वर्ग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई दि. २ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परिचय मेळावा समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष...