आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

नवरात्रोत्सवा निमित्त शरद नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन : नृत्यासह स्पर्धा व खेळ होणार संपन्न

वाडा/ पालघर ( प्रतिनिधी): " आम्ही संस्कृती जपतो - आम्ही परंपरा पाळतो ," हे घोषवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या वाडा शहरातील शरद नगरमधे सर्व सण-उत्सव मोठ्या थाटा - माटात साजरे होतात. या नगरातील सर्व रहिवासी मंडळी एकत्र येऊन खेळीमेळीच्या व आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व परंपरा व संस्कृती जपतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवाचे भव्य आयोजन रहिवासी मंडळी तर्फे करण्यात आले आहे. सलग ९ दिवस विविध स्वरुपाच्या स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम व गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शरद नगरचे संस्थापक शरद पाटील यांनी दिली.
    नवरात्रोत्सव चांगल्या प्रकारे साजरा व्हावा, यासाठी नगरातील रहिवासी मंडळीनी शरद नगर सार्वजनिक नवरात्रोउत्सव मंडळाची स्थापना करून उत्सव कमिटी नियुक्त केली आहे. या कमीटीच्या अध्यक्षस्थानी दिलीप कुमावत ,भावना मोकाशी यांची निवड करण्यात आली असून, देवेंद्र भानुशाली, रामचंद्र जाधव , राजेश दळवी, स्वप्नील पाटील, अर्जुन भालेराव , प्रकाश आगिवले , अमोल गांधी , साहेबराव तांबे ,बाळाभाऊ शिंदे , दीपक पवार, वनिता पाटील, पूजा उपाध्याय , प्रतीक्षा पाटील, वैशाली जाधव, स्वाती कुमावत, भरत मोकाशी यांच्यासह प्रमुख मान्यवरांचा कमिटी मधे समावेश आहे.
      नवरात्रोत्सवामधे सलग ९ दिवस गरबानृत्य, कुमारीका पूजन , फॅन्सी ड्रेस स्पर्धा , लकी ड्रॉ , हळदी- कुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम व अन्य स्पर्धा संपन्न होणार आहेत. वाडा शहरामधे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होणारा हा उत्सव असून शरद नगर मध्ये गेली १४ वर्षे सातत्याने तो चांगल्या प्रकारे साजरा केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शहापूर तालुक्यातील नडगावं जिल्हा परिषद गटातून हर्षल शेलवले निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

शहापूर (प्रतिनिधी): शहापूर तालुक्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यातील महत्त्वाचं जिल्हा...