आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित नवदुर्गा पुरस्कार २०२५ जाहीर.!

मुंबई : अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने, दरवर्षी विविध श्रेत्रात उल्लखनीय कार्य करणा-या महिलांचा "नवं दुर्गा पुरस्कारा " ने सन्मानीत करण्यात येते. २०२५ वर्षीचा पुरस्कार - निर्मला सामंत - प्रभावळकर ( माजी महापौर ), 
डॉ. गायत्री पांडव, सिल्व्हिया फार्नांडिस ( स्पिरिट्युअल ), नेहा पावसकर ( अंध स्पोर्ट्स कोच ), सावली परब ( योगा शिक्षिका ), 
अर्जंना भारत गणेशपुरे ( सेलिब्रेटी ), सिचिता महाले ( शिक्षिका ), विराली मोदी ( मोटीवेशनल स्पीकर ) व वंदना मिरचंदा (उद्योजिका ) यांना जाहीर झाला.
         नवदुर्गा पुरस्कार २०२५ सोहळा, गोरेगाव पूर्व येथील जय लीला हॉटेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात डि पी अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने व .अंध गायिका - विजयालक्षमी यादव हिच्या गरबा गीताने झाली. प्रथमच असंख्य अंध महिला - पुरुषानी गरबा नृत्यात सहभाग घेऊन सभागृह दणाणुन टाकले.
    संस्थेचे विश्वस्त - सचिन सरकाळे, अंजली सरकाळे व अश्विनी बोरगावकर यांच्या हस्ते नवदुर्गा चा सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक व भेटवस्तू देऊ सन्मानीत करण्यात आले. तसेच उपस्थित पाहुण्याचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उत्कृष्ठ नृत्या बाबत दोन, अंध महिलांना भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले.
       सर्व नवदुर्गानी मनोगत व्यक्त करून, अंजली सरकाळे यांचे आभार मानले. सूत्रसंचलन चिराग मुनानी व पूजा काळे यांनी केले व उपस्थिताचे आभार, सचिव अंजली सरकाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैलजा बोन्द्रे व कृतिका पवार यांनी खूपच मेहनत घेतली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

युवाशक्ती स्वयंसेवी संस्था नवी मुंबई व विद्यार्थी प्रतिष्ठान भांडुप वतीने शांतीवन पनवेल येथे केली दिवाळी साजरी

पनवेल( प्रतिनिधी):   युवाशक्ती स्वयंसेवी संस्था, नवी मुंबई च्या वतीने दरवर्षी सामाजिक भान जपणारा दिवाळी उपक्रम राबवला जातो. दिवा...