आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

ई-चलन मशीनने वाहनांचे फोटो काढण्याचे आदेश

मुबंई  (सतिश पाटील):पोलिस खाजगी मोबाईलने फोटो काढू शकत नाहीत. तथापि, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे फोटो काढण्यासाठी वाहतूक पोलिसांना आता अधिकृत ई-चलन मशीन्स देण्यात आल्या आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतःच्या फोनचा वापर करून फोटो काढल्यास कारवाई होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. 
     वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांचे फोटो काढण्यासाठी वाहतूक पोलिसांना ई-चलन मशीन देण्यात आल्या आहेत. खाजगी मोबाईलचा वापर करू नये.या मशीन्स उपलब्ध असतानाही वाहतूक पोलिस अनेकदा स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर करून वाहनांचे फोटो काढतात, यावर आळा घालण्यात आला आहे. २ जुलै रोजी परिवहन मंत्रींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, वाहतूक कारवाईदरम्यान पोलिसांना स्वतःच्या खाजगी मोबाईलवरून फोटो किंवा व्हिडिओ न काढण्याचे आदेश देण्यात आले. 
स्वतःच्या खाजगी मोबाईलने फोटो काढणाऱ्या पोलिसांवर आता कारवाई होणार आहे, असे निर्देश देण्यात आले आहेत. 
     थोडक्यात, जरी तुम्ही किंवा इतर नागरिकांनी नियमाचे उल्लंघन केले असेल, तरी वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर करू नये. त्याऐवजी, त्यांनी ई-चलन मशीनचा वापर करणे अपेक्षित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देवरुखात रंगला महिला आणि कामगार दिनाचा सोहळा ;चार महिलांना हिरकणी,पाच अधिकारी यांना कार्यक्षमअधिकारी, तर तीन कामगारांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित

कोकण (शांताराम गुडेकर )   १ मे कामगार दिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लोकनिर्माण वृत्तपत्राच्या वतीने चार महिलांना हिरकणी, पाच अधिकारी...