गोरेगाव पूर्व येथील, संकल्प सहनिवास ज्येष्ठ नागरिक संघ, यांच्या वतीने, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात, " जागतिक योग दिन " मोठया उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला. योग दिनाला, योग शिक्षिका - मनिषा गोहिल व ललिता सावंत व्यासपीठावर उपस्थित होत्या. संस्थेचे सचिव - सूर्यकांत सोडये यांनी त्यांचे स्वागत केले.
योग ही केवळ शारीरिक व्यायाम पद्धती नसून, ती एक जीवन शैली आहे. योगामुळे शरीर लवचिक राहते, रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आजरा पासून संरक्षण मिळते. म्हणून योगा करणे फार महत्वाचे आहे. असे योग शिक्षिका - मनिषा गोहिल यांनी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके करून घेतली.योगा सोहळ्यास असंख्य महिला - पुरुष उपस्थित होते.
संस्थाचे अध्यक्ष - दिलीप घारकर, उपाध्यक्ष - शांताराम खामकर, सचिव - सूर्यकांत सोडये, खजिनदार - अनिल परब सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवर शिक्षक व उपस्थित्यांचे आभार - सौ. शितल खामकर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा