आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

प्रमोद शिंदे यांचे ४१ वे यशस्वी रक्तदान


कल्याण :(सुनिल इंगळे ) रक्तदानाने अनेकांना,गरजु रुग्णांना जीवदान मिळते.मागील ३० वर्षांपासून श्री प्रमोद शिंदे नियमित रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतात .याबरोबरच स्वतः योग करून निरंतर योग प्रचार,प्रसार करत असतात.वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्य सुदृढ रहावे यासाठी त्यांचा हा प्रयत्न निश्चितच गौरवास्पद आहे. श्री प्रमोद शिंदे हे जिल्हा परिषद शाळा लतीफवाडी ता.शहापूर येथे शिक्षक असून त्यांनी अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे भव्य दिव्य रक्तदान कार्यक्रमात ४१वे यशस्वी रक्तदान पार पाडले. या अगोदर ते योग रेपरी, योग पंडित योगाचार्य आदी किताबांनी ते सन्मानित झाले आहेत. आवडीच्या या विशेष कार्याबद्दल पतंजली योग समिती कल्याणचे ज्येष्ठ मान्यवर श्री.सतीश मुळावेकर, समाजसेवक,पत्रकार व बहिणाई ट्रस्टचे अध्यक्ष सुनील इंगळे, शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील तसेच मा.आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई दि. २ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परिचय मेळावा समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष...