मुंबई( गणेश हिरवे) शिवसेना उबाठा शाखा क्रमांक ५४ चे शाखाप्रमुख अजित भोगले यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शाखाप्रमुख पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या फेब्रुवारी महिन्यात तो त्यांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते देण्यात येणार असल्याचे जॉय संस्थापक गणेश हिरवे यांनी सांगितले.अजित यांचे काम चांगले असून कायमच विभागात उद्भभवणाऱ्या समस्या लागलीच सोडविण्यासाठी तत्पर असतात.सुरवातीला ते शिवसेना पक्षाचे कार्यलय प्रमुख होते, मग उप शाखाप्रमुख झाले आणि आता २०११ पासून शाखा प्रमुख म्हणून काम करीत आहेत.अनेक नागरिकांशी त्यांचा नेहमीच संपर्क असून अडल्या नडलेल्याना कायमच ते सहकार्य करीत असतात.विभागातील नागरिकांना ते रात्री अपरात्री देखील मदत करतात.अजित यांना पुरस्कार जाहीर झाल्याने अनेकांनी त्यांना भेटून आनंद व्यक्त केला, भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.एक आदर्श शाखा प्रमुख कसा असावा हे अजित भोगले यांचेकडे पाहून समजते आणि यामुळेच त्यांना जॉय संस्थेच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
मुंबई दि. २ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परिचय मेळावा समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
-
ठाणे : रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी खिडकाळीमध्ये 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या सं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा