पेण (पंकज पाटील ) श्री क्षेत्र दत्त देवस्थान पिंगळ आळी, दिव-पो . वाशी, ता.पेण , जि.रायगड याठिकाणी सालाबाद प्रमाणे शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा भक्तिभावाने साजरा होणार आहे.
    यावेळी शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी सायं. ६:०० वा. गुरुवर्य भजन सम्राट स्व. दत्तुवूबा ओढांगीकर यांच्या शिष्या कु. वैदेही पाटील ( कळवे) यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्रौ ठिक ९:०० वा. आंतरराष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प श्री राघवेंद्र नरहरी देशपांडे ( मु .पो तेरढोकी, ता . जि धाराशिव )यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
     तसेच शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २: ०० श्री औदुंबर प्रासादिक संगीत भजन मंडळ, दिव ,तर २:३० ते ३:३० वा. ह.भ.प श्री कृष्णा बापू पाटील ( दिवपाडा) यांचे प्रवचन व सायंकाळी ह.भ.प श्री राघवेंद्र देशपांडे  यांचे श्री दत्तजन्मोत्सवाचे कीर्तन  होईल. दोन दिवस चालणाऱ्या कीर्तनाच्या या कार्यक्रमात हार्मोनियम साथ - श्री संतोष शांताराम पाटील, तबलासाथ श्री सुभाष शांताराम पाटील, घोडाबंदर यांची लाभणार आहे.
    त्यानंतर आरती , तीर्थप्रसाद, महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न होतील .याच दिवशी रात्रौ ९:३० वा. संगीत भजनाची जुगलबंदी होणार असून त्यामध्ये श्री दत्त प्रासादिक महिला भजन मंडळ,(मोहोचा पाडा- पनवेल) गायिका वंदना म्हात्रे व आई एकवीरा  भजन मंडळ , (डोंबिवली) गायिका सौ . सुजाता पाटणकर यांच्यात संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
       तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी, बेडेकऱ्यांनी या श्री दत्त जयंती महोत्सवात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा