आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १५ डिसेंबर, २०२४

जोगेश्वरीतील निखिल बनसोडे याची उच्च शिक्षणासाठी जर्मनीला भरारी..आर्थिक परिस्थितीवर मात करत मिळवले उत्तुंग यश

मुंबई (उदय वाघवणकर )- मुंबई पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी (पूर्व) भागातील प्रताप नगर ह्या झोपडपट्टी वसाहती मधील दहा /आठ च्या खोलीतून कौलारू झोपड्यातून जन्म घेतलेल्या निखिल शरद बनसोडे यांनी उच्च शिक्षणासाठी जर्मनीमध्ये उंच भरारी मारली आहे.जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडच्या कडेला दहा / आठ च्या घरामध्ये सर्वसामान्य कुटुंबात १८ मे १९९५ रोजी जन्म घेतलेल्या निखिल शरद बनसोडे यांनी जोगेश्वरीतील बांदिवली विद्यामंदिर शाळेत पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि माटुंगा येथील रुपारेल कॉलेजमधून विज्ञान शाखेत पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.घरामध्ये अभ्यास करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.रस्त्यावर वाहनांचा आवाज, प्रदूषण, वडिलांचे आजारपण या सर्व परिस्थितीवर मात करत रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत जागून अभ्यास पूर्ण करण्याची जिद्द वेगळीच होती.त्यांच्या सोबत लहान बहीण ही त्याच जिद्दीने अभ्यास करून भावाची प्रगती पाहत होती पावसाळ्यात दारातील गटातील दुर्गंधीयुक्त पाणी सातत्याने घरात येत होते.परंतु अशा कठीण प्रसंगी ही सातत्याने अभ्यास करणे त्यांनी महत्वाचे समजले.नंतर रूपारेल महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी जळगाव येथेल शासकीय तांत्रिक महाविद्यालयात प्रवेश घेतला जळगाव शहरात शासकीय वसतीगृहात राहून इलेक्ट्रिक इंजिनियरची पदवी प्राप्त केली पदवीधर शिक्षण पूर्ण करतात त्याने मुंबईतील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीमध्ये ठेकेदारी पद्धतीवर मॅनेजर या पदावर नोकरी केली.परंतु शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे या विचारानुसार त्याने ठेकेदारीची नोकरी सोडून जर्मनी मध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याचा स्वतःचा पर्याय निवडला.जर्मनी भाषा शिकून त्या भाषेवर प्रभुत्व मिळविले जर्मनीत जाऊन शिक्षणाची सर्वस्वी प्रयत्न करून जोगेश्वरी च्या झोपडपट्टीतुन अखेर जर्मनीला रवाना झाला.जर्मनी उच्च शिक्षण घेत असताना प्रेमळ स्वभाव चांगले गुण त्यामुळे जर्मनी युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष पदाची निवड झाली आणि तो अध्यक्ष पदाचा दावेदार बनला.सध्या जर्मन युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे.जर्मनीमध्ये जाण्यासाठी त्याने आई-वडील नातेवाईक किंवा मित्रांची मदत न घेता शैक्षणिक कर्ज व्हीसा पासपोर्ट तिथे राहण्याची सोय पर्याय कॉलेज प्रवेश स्वबळावर करून जर्मनीला रवाना झाला ह्याला कर्तृत्व व जिद्द म्हणतात त्याच्या ह्या कर्तुत्वाला मानाचा सलाम दिला पाहिजे.दरम्यान एका महिन्याच्या सुट्टीत दिवाळीमध्ये भारतात घरी आल्यानंतर सर्वांनी त्याचे कौतुक केले.स्थानिक खासदार रवींद्र वायकर यांनी त्याला श्री गणेशाची चांदीची मूर्ती शाल श्रीफळ देऊन विशेष सत्कार केला गरिबी आर्थिक परिस्थिती आणि भौगोलिक स्थितीचे ऐन तारुण्यात भान ठेवून पुढील प्रगतीचा व जगण्याचा मार्ग शोधणारा आणि इतर समाजाची आर्थिक परिस्थिती कशी असेल यावर तर विचार करणारा "अवलिया तरुण पिढी म्हणजे निखिल शरद बनसोडे" होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई दि. २ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परिचय मेळावा समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष...