पेण (प्रतिनिधी) पेण- कुंभार आळीतील 'श्री समर्थ सर्वांगीण विकास संकुल' चे संस्थापक-अध्यक्ष आणि श्री समर्थ योग निसर्गोपचार संशोधन केंद्राचे संचालक, श्री.रवींद्र रामचंद्र म्हात्रे तथा हिलर प्रा.भाऊ म्हात्रे यांना पर्यायी आरोग्य चिकित्सा क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अखिल भारतीय मारवाडी गुजराथी मंच आणि स्वर्गीय मामासाहेब हुकूमशहा बागमार एक्युप्रेशर, नुट्रिशन, व्यसनमुक्ती, प्यारालिसिस, कॅन्सर रिसर्च सेंटर आयोजित; "ग्रॅन्ड आयकाॅन सोशल ॲन्ड हेल्थ ॲवार्ड्स 2024" या कार्यक्रमात हिलर-रवींद्र रामचंद्र म्हात्रे तथा प्रा.भाऊ म्हात्रे-यांना दि १ डिसेंबर रोजी हाॅटेल राॅयल हेरिटेज गंजमल, नाशिक या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ."स्टेट हेल्थ सोशल सेवा समाज रत्न ॲवाॅर्ड" असे या पुरस्काराचे नाव आहे.
योगिक प्राणिक हिलींग, योगसाधना, प्राणायाम, ध्यान (मेडिटेशन) स्वसंमोहन अशा विविध संमिश्र उपचार पद्धतीने भाऊ सरांनी अनेकांना व्याधीमुक्त केले आहे.
निसर्गोपचार, आयुर्वेद यांचेही चांगलेच ज्ञान सरांना आहे. सर्व आजारांवर उपचार व समुपदेशन सर आत्मियतेने, आपुलकीने करतात. कुंभार आळी तलावाजवळ,पेण- रायगड येथे उपचार केंद्र आहे. 8983011737 या भ्रमण ध्वनीवर संपर्क साधावा. 'निसर्गोपचार हाॅस्पिटल' आपल्या पेण तालुक्यात व्हावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत.ज्यामुळे गोरगरीब रूग्ण विनामूल्य/अल्पमोबदल्यात उपचार घेऊ शकतील.समाजाकडून या कार्यासाठी मदत मिळल्यास स्वीकार केला जाईल असे नम्र निवेदन भाऊ करीत आहेत.
पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व रूग्ण परिवार, हिलर परिवार, मित्र मंडळी आणि हितचिंतकांकडून हिलर प्रा.भाऊ म्हात्रे सरांवर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा