आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

राज्यस्तरीय "रत्नाकर काव्य पुरस्कार"मिळाल्याबद्दल एस.एम.हायस्कूलचे माजी विद्यार्थी डाॅ.अनिल धाकु कांबळी यांचा एस्.एस्.सी.१९७६च्या बॅचच्या वतीने यथोचित सत्कार

कणकवली(गुरुनाथ तिरपणकर)दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणा-या२०२३च्या राज्यस्तरिय काव्य पुरस्कारासाठी कवी डाॅ.अनिल धाकु कांबळी(नांदगाव,कणकवली) यांच्या'इष्टक'या काव्य संग्रहाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.याचा कणकवली येथील एस्.एम्.हायस्कुलच्या १९७६च्या एस्.एस्.सी.बॅचच्या सर्व मित्रमंडळींना सार्थ अभिमान आहे.कवी डाॅ.अनिल कांबळी यांच्या काव्य संग्रहाला राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्याबद्दल नुकताच त्यांचा कणकवली येथील एस्.एम्.हायस्कुलच्या१९७६च्या बॅचच्या मित्रमंडळींच्या वतीने भरत तोरसकर,प्रसाद देसाई,शेखर ओरसकर,गुरुनाथ तिरपणकर यांच्या उपस्थितीत शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.कवी डाॅ.अनिल कांबळी यांनी कौटुंबिक,डाॅक्टरी पेशातील अनुभव,शालेय जीवनातील आठवणी,घरी येऊन भेटणारे शालेय मित्र,अशा व इतर जुन्या आठवणींना उजाळा दिला.छोटेखानी घरगुती स्वरूपात झालेला हा सत्कार आमच्यासाठी अविस्मरणीय असाच होता.याप्रसंगी कवी डाॅ.अनिल धाकु कांबळी यांनी "किलकिल्या उजेडाची तिरीप"हा काव्यसंग्रह भेट दिला.पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व मित्र-मैत्रिणींच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.शेवटी अल्पोपहाराने सत्कार समारंभाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई दि. २ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परिचय मेळावा समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष...