आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

मातोश्री शालिनी झापर्डे श्री दत्त गुरु चरणी विलीन

नेरुळ (सुभाष हांडे देशमुख):  नवी मुंबईतील यूथकौन्सिल नेरुळ या सेवाभावी संस्थेचे सल्लागार व सिडको प्रशासनातून उच्च पदावरून सेवानिवृत्त झालेले मा. श्री. सुरेंद्र झापर्डे यांच्या मातोश्री शालिनी झापर्डे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी नेरुळ येथे राहत्या घरीच वृद्धपकाळाने निधन झाले. मुले, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार लाभलेल्या शालिनी माता यांनी जीवनभर अध्यात्माची कास धरली. खूप प्रेमळपणे व समाधानाने संसार केला. वाढवला आणि फुलवला. सहाजिकच मार्गशीर्ष शु. १४, श्रीदत्त जयंती या शुभ दिनी त्यांना वैकुंठवास घडला. श्री दत्तगुरु चरणी त्यांचे शरीर विलीन झाले. संपूर्ण परिवारावर त्यांनी चांगले संस्कार केले. म्हणूनच त्यांचे पुत्ररत्न श्री. सुरेंद्र यांनी नोकरी, कुटुंब प्रामाणिकपणे व आदर्शवत सांभाळून आईचाही त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत खूप चांगला सांभाळ केला. साहजिकच त्या माऊलीला ९४ वर्षे एवढे दीर्घ आयुष्य लाभले. शालिनी मातेने दिलेला मानवतेचा वसा श्री. सुरेंद्र यांनी जपला आहे. यूथकौन्सिल नेरुळ बरोबरच वाशी येथील श्री गजानन महाराज भक्त मंडळ या संस्थेमार्फतही जबाबदारी घेऊन ते लोकांच्या सेवेत मग्न आहेत. 
   शालिनी माता यांच्यावर दिनांक १५ डिसेंबर रोजी नेरुळ येथील सेक्टर चार मधील स्मशानभूमीत विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. सिडकोतील अधिकारी वर्ग, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.वैकुंठवासी शालिनी माता यांना नेरुळ यूथकौन्सिल परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

'कोकणरत्न' पदवीसाठी बाळ पंडित यांची निवड

मुंबई : स्वतंत्र्य कोकणराज्य अभियान यांच्या वतीने 'कोकणरत्न' पदवीसाठी, ज्येष्ठ पत्रलेखक, पत्रकार, व सामाजिक कार्यकर्ते...