ठाणे (प्रतिनिधी) पंचायत समिती मुरबाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 16 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ भिवंडी संचलित तळेगाव विभाग हायस्कूल तळेगाव ता मुरबाड या विद्यालयाचे शिक्षक समुपदेशक आणि बिलघर गावचे सुपुत्र संस्थेच,शाळेचं,बिलघर गावचं नाव महाराष्ट्रभर रोशन करणारे बिलघर गावचे सुपुत्र श्री कल्पेश माधुरी मनोहर शिंदे यांनी आदर्श भारताचे उद्याचे भावी वैज्ञानिक व गणिततज्ञ घडविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून माध्यमिक शिक्षक अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य बनवून या स्पर्धेत भाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनात श्री कल्पेश मनोहर शिंदे हे माध्यमिक शिक्षक अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. याबद्दल त्यांना गटविकासअधिकारी सन्माननीय लता गायकवाड मॅडम,गटशिक्षणाधिकारी संप्रदा पानसरे मॅडम, विस्तार अधिकारी श्री संजय थोरात साहेब, टिळक स्कॉलर विद्यालयाच्या प्राचार्या विशाखा मॅडम या मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवचिन्ह,सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आणि सरांची जिल्हास्तरासाठी निवड झाल्याबद्दल सरांचे शालेय सल्लागार समितीचे चेअरमन श्री अरुणबंधू चौधरी,सदस्य श्री दीपक देशमुख,श्री श्रीकांत देशमुख आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ फुलपगारे मॅडम,शिक्षक प्रतिनिधी श्री मंगल कोळी सर ,सर्व शिक्षक,सर्व पालक,सर्व विद्यार्थी,बिलघर पंचक्रोशीतील पालकवर्ग यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्री कल्पेश शिंदे सर यांनी आपल्या बिलघर गावच्या,पदमश्री संस्थेच्या व तळेगाव शाळेच्या इतिहासात मानाचा तुरा रोवल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. आणि सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरील लोकप्रिय ‘माझी माय’ मालिकेतील शारदा खानविलकर अनंतात विलीन
मुंबई (भांडुप) :- महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगंण्य शिक्षणतज्ञ व सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक / संचा...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
-
ठाणे : रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी खिडकाळीमध्ये 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या सं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा