आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरील लोकप्रिय ‘माझी माय’ मालिकेतील शारदा खानविलकर अनंतात विलीन

मुंबई (भांडुप) :- महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगंण्य शिक्षणतज्ञ व सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक / संचालक रमेश खानविलकर यांच्या मातोश्री शारदा श्रीराम खानविलकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्या ८३ वर्षाच्या होत्या. 
    ‘सह्याद्री’ या राष्ट्रीय मराठी दूरदर्शन वाहिनीवरील, प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते निवेदित ‘माझी माय’ या प्रसिद्ध व लोकप्रिय मालिकेत भरत जाधव, निशिगंधा वाड, अश्विनी भावे, सुमित राघवन, सुबोध भावे, फुलवा खामकर, सचिन खेडेकर, अशा दिग्गजा माता -पुत्र यांच्या मुलाखती सोबतच शिक्षणतज्ञ रमेश श्रीराम खानविलकर व शारदा श्रीराम खानविलकर माता-पुत्र यांची दोन भागात झालेली मुलाखत खूप गाजली होती. आजही यु -ट्युबवर अनेक जण ती मुलाखत पहातात. 
       ‘माझी माय’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी श्रीमती शारदा खानविलकर यांचे वर्णन करताना म्हणाल्या होत्या की, माझी शारदा माय दुबळीचा संसार दुबळा, किती सोसल्या तिने उन्हापावसाच्या झरा, माझी गरीब माऊली, माझ्या वाटेची सावली.. शारदा खानविलकर यांनी जीवनात,आयुष्यात अठराविश्व दारिद्र्य अनुभवले... जीवनात नातेवाईकांकडून पावलोपावली कृतज्ञता अनुभवली, पण शारदा खानविलकर नेहमी आपला मुलगा रमेश खानविलकर यांना घडवताना नेहमी कृतज्ञ राहण्याचा सल्ला देत असत. माऊली मोठी धिराची,दारिद्र्यावर मात करून पुन्हा खंबीरपणे उभी राहिली. स्वतः कमी शिकलेली मात्र रमेश खानविलकरांना त्या नेहमी सांगायच्या एक वेळ जेवला नाहीस तरी चालेल, उपाशी रहा पण शिक्षण घेण्यास कसुर करू नकोस उद्याचा नागरिक ‘शाळेतून’ घडणार आहे.  
      शून्यातून विश्व निर्माण करताना आपण आपल्या जिद्दीला, मेहनतीची जोड दिली की,आपल्या स्वप्नाला आकाश देखील थिट्ट पडते ! अशी प्रेरणा देऊन शिक्षणतज्ञ रमेश खानविलकर यांना घडवणारी ‘माझीमाय’ शारदा खानविलकर या जातानाही समाजासाठी शाळा, महाविद्यालय, वस्तीगृह, व्यावसायिक अभ्यासक्रम, महाविद्यालय निर्माण करणारा पुत्र रमेश खानविलकर या समाजाला दिला. त्याच्यासोबत पत्नी, नातवंडे हे देखील त्यांची शिकवण पुढे जतन करत आहेत. नुकतेच १ ऑगस्ट ला त्याचा नातू रिद्धेश खानविलकर यांनी ईशान्य मुंबईतील भांडुपमध्ये विधी महाविद्यालय सुरू केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरील लोकप्रिय ‘माझी माय’ मालिकेतील शारदा खानविलकर अनंतात विलीन

मुंबई (भांडुप) :- महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगंण्य शिक्षणतज्ञ व सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक / संचा...