आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५

घाटकोपर पश्चिम विधानसभा ग्राहक संरक्षण कक्षतर्फे घाटकोपर स्टेशन प्रबंधक यांना निवेदन

मुंबई (शांताराम गुडेकर)  शिवसेना नेते सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष,खासदार श्री.अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्राहक कक्षाचे सचिव अशोक शेडे,सचिव निखिल सावंत यांच्या सुचनेनुसार ईशान्य मुंबई विभाग प्रमुख सुरेशजी पाटील यांच्या सहकार्याने घाटकोपर पश्चिम कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर यांच्या प्रयत्नातून आज दिनांक ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी घाटकोपर स्टेशन येथुन कल्याण व कर्जत दिशेला जाण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला डाऊन मार्गावर लोकल चालू करण्याबाबत घाटकोपर स्टेशन मास्तर यांच्या जवळ ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा यांच्यामार्फत घाटकोपर स्टेशन प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले.
              प्रथम स्टेशन मधील स्टेशन प्रबंधक श्री.मधु कुमार यादव यांच्याशी वरील निवेदनाचे बाबत चर्चा विनिमय करून निवेदन सोपवण्यात आले.निवेदनमध्ये घाटकोपर स्टेशन मधून संध्याकाळच्या वाढत्या प्रवासी गर्दीला थोडा दिलासा मिळावा,त्यांचा प्रवास थोडा सुखकर व्हावा यासाठी घाटकोपर स्टेशन मधून संध्याकाळच्या वेळेला कल्याण व कर्जत दिशेला जाण्यासाठी लोकल चालू करण्यात यावी.तसेच घाटकोपर स्टेशन मध्ये जादा प्लॅटफॉर्मचे गरज असल्याची मागणी करण्यात आली आहे.तरी त्या संदर्भात निर्णय घ्यावा.घाटकोपर स्टेशन हे मुंबईचे केंद्रबिंदू झाल्याने येथे घाटकोपर जंक्शन होण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी ग्राहक संरक्षण पक्षाचे पदाधिकारी यशवंत खोपकर विधानसभा संघटक,अनंत पवार कक्ष प्रसारक, उपसंकटक राजेंद्र पेडणेकर, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...