आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५

ज्ञानदेव हांडे यांची शिवसेना शिक्षक शिक्षकेतर सेना संघटनेच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

मुंबई | प्रतिनिधी : शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने , शिवसेना सचिव श्री. संजयजी मोरे व शिवसेना युवा नगरसेवक श्री. किरणभाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाने तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे राज्याध्यक्ष शिक्षक आमदार श्री. किशोरजी दराडे सर यांच्या हस्ते श्री. ज्ञानदेव लक्ष्मण हांडे सर यांची शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या "राज्य उपाध्यक्षपदी" नियुक्ती करण्यात आली.
     ज्ञानदेव हांडे यांनी प्लॅन टू नाॅन प्लॅनचा लढा , कोरोनाकाळात हजारो शिक्षकांसाठी ऑनलाइन अध्ययन-अध्यापन कार्यशाळा , मुंबई महानगर पालिका खाजगी शाळांसाठी वेतन अनुदानासाठी तसेच शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी अनेक आंदोलने केली. पक्ष व संघटना वाढिसाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. संघटनात्मक कार्यासाठी शिक्षण क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

घाटकोपर पश्चिम विधानसभा ग्राहक संरक्षण कक्षतर्फे घाटकोपर स्टेशन प्रबंधक यांना निवेदन

मुंबई (शांताराम गुडेकर)  शिवसेना नेते सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष,खासदार श्री.अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शना...