आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ संस्थेचा ४४ वा वर्धापन दिन संपन्न

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख) :
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉन) संस्थेचा ४४ वा वर्धापन दिन सोहळा नेरुळ येथील जेष्ठ नागरिक संघाच्या श्री गणेश सभागृहात दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी भूषविले. प्रसंगी अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष विश्वासराव भदाणे, ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दि. ना. चापके, फेसकॉम चे माजी अध्यक्ष अरुण रोडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक तेरकर मुंबई अध्यक्ष सुरेश पोटे, चंद्रकांत महामुनी, ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, प्रभाकरराव गुमास्ते, विकास साठे, रणजीत दीक्षित, नंदलाल बॅनर्जी आदी मान्यवरांसह महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून आलेले ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ पुरुष व जेष्ठ नागरिक संघांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
   याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना फेस्कॉमच्या महाराष्ट्रात चाललेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या उपक्रमांचे कौतुक करत गणेश नाईक म्हणाले की, कार्यक्रमाच्या सुरुवातीस झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातूनच आपल्यातील असलेला प्रचंड उत्साह लक्षात आला. या वयातही आपण हा उत्साह जपता आणि जीवनाचा आनंद घेता ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. ती अधिक गतिमान होण्यासाठी मी आपल्याबरोबर आहे. खरे तर या जेष्ठ नागरिक संघाच्या सुरुवातीच्या काळापासून मी संपर्कात आहे. ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे प्रथम नवी मुंबईत उभी राहिली याचा उल्लेख करुन त्यांनी ज्येष्ठांसाठी विविध स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या योजनांचा सखोल आढावा घेतला. ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना ग्राम पातळीवर प्रत्येक ठिकाणी उभे करण्यासाठी मी सरकार दरबारी प्रयत्नशील राहील असेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा, अडचणी मी जाणतो त्यातल्या त्यात मुलांपासून विभक्त राहणारे जेष्ठ नागरिकही खूप आहेत, त्यांच्यासाठी तत्काळ पद्धतीची सेवा मिळण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सेवा केंद्रे उभी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपण आई-वडिलांना सुखाचे दिवस द्या तरच तुमची मुलेही तुम्हाला सुखाचे दिवस देतील असेही त्यांनी सुचित केले.
   प्रसंगी अण्णासाहेब टेकाळे, विश्वासराव भदाणे, दिगंबर चापके, अरुण रोडे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.ज्येष्ठांनी बसविलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण तसेच महाराष्ट्र गीत आणि गणेश वंदनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत महामुनी यांनी केले. श्रीमती पल्लवी देशपांडे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले तर शेवटी अशोक तेरकर यांनी उपस्थितांचे यथोचित आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ज्येष्ठांचे मनोबल वाढविण्यासाठी लोअर परेल येथे करा ओके स्पर्धा संपन्न!

मुंबई : फॅमिली वेलफेअर सेंटर, लोअर परेल व रोटरी क्लब डाऊन टाऊन, सी लँड व इंटरव्हील क्लब, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, लोअर ...