आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

दहावीच्या १००० विद्यार्थ्याना प्रश्न संचाचे वाटप

मुंबई (गणेश हिरवे)शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शिवसेना नेते सुनील प्रभू व युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांच्या माध्यमातून विभागातील शिवसेना शाखा क्रमांक ५४ दहावीच्या च्या परीक्षेत बसणाऱ्या हजारो विद्यर्थ्याना परीक्षेचा सराव करण्यासाठी दरवर्षी प्रश्न संच वाटप केले जाते. तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून हे प्रश्न संच निर्माण केले जातात. यातून अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगले गुण मिळविले आहेत .विभागातील शिवसेना शाखा ५४ अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमधील १००० पेक्षा जास्त विद्यार्थांना या प्रश्न संचाचे वाटप केले जाते.काही विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन प्रश्न संच वाटप करताना सर्व शिवसेनेचे शाखागप्रमुख अजित भोगले, युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व महिला आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ज्येष्ठांचे मनोबल वाढविण्यासाठी लोअर परेल येथे करा ओके स्पर्धा संपन्न!

मुंबई : फॅमिली वेलफेअर सेंटर, लोअर परेल व रोटरी क्लब डाऊन टाऊन, सी लँड व इंटरव्हील क्लब, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, लोअर ...