आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

ज्येष्ठांचे मनोबल वाढविण्यासाठी लोअर परेल येथे करा ओके स्पर्धा संपन्न!

मुंबई : फॅमिली वेलफेअर सेंटर, लोअर परेल व रोटरी क्लब डाऊन टाऊन, सी लँड व इंटरव्हील क्लब, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, लोअर परेल येथील, फॅमिली वेलफेअर सेंटर च्या कार्यालयात, ज्येष्ठांसाठी करा ओके स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
        प्रथम पारितोषिक - ज्ञानेश्वर चव्हाण, द्वितीय - किसन चव्हाण व तृतीय - शांताराम चिपळूणकर देण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ - शिवराम पालव, सूर्यकांत पालव व कुंदना पंडित यांना देण्यात आले. रोटरी क्लब मुंबई च्या अध्यक्षा - चंद्रा खोना व इंनरव्हील क्लब मुंबई यांच्या अध्यक्षा - आशिता दावडा यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धाकांचा सन्मान करण्यात आला. उपस्थिताना प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेसाठी फॅमिली वेफअर एजन्सी च्या असंख्य ज्येष्ठ पुरुष - महिला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ज्येष्ठांचे मनोबल वाढविण्यासाठी लोअर परेल येथे करा ओके स्पर्धा संपन्न!

मुंबई : फॅमिली वेलफेअर सेंटर, लोअर परेल व रोटरी क्लब डाऊन टाऊन, सी लँड व इंटरव्हील क्लब, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, लोअर ...