मुंबई - सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार आणि साहित्यिक डॉ सुरेश भिवाजी पाटील यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन स्वतंत्र कोकणराज्य अभियान संघटनेतर्फे कोकणरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
डॉ सुरेश भिवाजी पाटील यांची महाराष्ट्र शासना तर्फे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आहेत. कोकण रेल्वे प्रवासी संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. वैभववाडी तालुका विकास संस्था संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, भारतीय ह्युमनराईट संघटनेचे मुंबई उपाध्यक्ष आहेत तसेच साई एज्युकेअर ट्रेनिंग स्कूल या संस्थेचे संचालक आहेत. गेली २१ वर्ष सातत्याने शिक्षण क्षेत्रात काम करत असताना त्यांनी २५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी घडविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी, मुंबई मराठी पत्रकार भवन, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार आणि संपादक श्री सचिन कळझुनकर यांची उपस्थितीत लाभणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा