जोगेश्वरी (गणेश हिरवे) दिनांक १५ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक ग्रुप १२/५ मधील सर्वात सिनियर सभासद सन्मा हरिश्चंद्र कदम वय ८७ वर्ष यांचा वाढ दिवस मोठ्या उत्साहात आरे कॉलनीतील वनराईत मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
यावेळी कदम यांनी स्वहस्ते कल्पवृक्ष लावला आणि उपस्थित सभासदांनी इतर झाडे लावून पर्यावरण रक्षण करण्यास, वृक्ष संपदा वाढविण्यास मदत केली.उपस्थित सर्वांनी कदम यांना शुभेच्छा देऊन नॅचरल बुके तयार करून देत शतायुषी व्हा असे आशीर्वाद दिले.कदम यांनी देखील सर्वांच्या शुभेच्छा मनापासून स्वीकारल्या.दररोज सकाळी साडेपाच ते आठ वाजेपर्यंत येथे ग्रुपचे सभासद उपस्थित राहून विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करीत असतात, झाडे लावत असतात, त्यांना नियमितपणे पाणी घाऊन त्यांची जोपासना करतात.ग्रुपचे सभासद विजय कांबळे हे सर्वांना वाढ दिवसाच्या निमित्ताने नॅचरल बुके तयार करून भेट देतात जो खरंच सर्वांना मनापासून आवडतो.यावेळी हिरवे सरांनी देखील नेहमीप्रमाणे त्यांचा छंद जोपासत कदम यांचा आशीर्वाद घेत त्यांना लोकप्रिय हसती दुनिया मासिक भेट दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा