आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

बृहनमुंबई महानगर पालिका एल विभाग आंतरशालेय समूहगान स्पर्धा संपन्न

जोगेश्वरी(गणेश हिरवे): नुकतीच मुंबईत एल विभाग अंतर्गत समूह गान स्पर्धा संपन्न झाली त्यात सहभागी १४ शाळातून कुर्ला येथील गांधी बाल मंदिर शाळा प्राथमिक विभागाला प्रथम क्रमांक मिळाला. समता विद्या मंदिर साकीनाका येथे याचे आयोजन करण्यात आले होते.झाडे लावा हे पर्यावरण गीत सादर करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील, संतोष साखरे, उत्तम कोळंबेकर यांनी विद्यार्थ्यांना गीतासाठी मार्गदर्शन केले. शिक्षण निरीक्षिका भारती भवारी प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होत्या.गांधी बाल मंदिर सहभागी विद्यार्थ्याचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

महिला वादक, गायिकांच्या सादरीकरणाने संगीतप्रेमी तृप्त

नवी मुंबई : लता मंगेशकर, आशा भोसले या नामांकित गायिकांनी अजरामर केलेली एकाहुन एक सुंदर, श्रवणीय गाणी "रहे ना रहे हम" ...