ठाणे (प्रतिनिधी)ठाणे जिल्हा कल्याण येथील साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या अनिता प्रविण कळसकर यांना नुकताच प्रेरणा फाऊंडेशनने त्यांच्या कार्याची दखल घेऊन "राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ" या पुरस्काराने बल्लाळेश्वर मंगल कार्यालय बदलापूर इथे शाल,पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी प्रेरणा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रेरणा कुलकर्णी, सचिव श्री.वैभव कुलकर्णी,डाॅ.अविनाश म्हात्रे, श्री.रामजित गुप्ता ,अॅड.मोहन शुक्ला ,तसेच मा.लेखा तोरसेकर यांनी तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.प्रेरणा फाऊंडेशन ही एक सामाजिक जबाबदारीचे. भान ठेवणारी संस्था असून या संस्थेमार्फत अनेक आदिवासी,गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते.अनेक उपक्रम या संस्थेमार्फत चालवले जातात.या पुरस्कार सोहळ्यात जवळपास १५० स्री/पुरूषांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . कार्यक्रम अतिशय थाटात पार पडला.
लेखिका आणि कवयित्री असलेल्या तसेच शब्दसुमने साहित्यिक मंचच्या संस्थापिका आणि अध्यक्षा मा.अनिताताई प्रविण कळसकर यांना "राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ" पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव साहित्यिक जगतात होतोय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा