मुंबई (शांताराम गुडेकर)मुंबई सह उपनगर, कोकण विभागात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पंचरत्न मित्र मंडळ(रजि.),राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाइजर्स लिमिटेड चेंबूर तसेच सुराना सेठिया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच "आपला घाटला गांव आपला विकास " यांच्या माध्यमातून घाटला गांव येथे मोफत वैद्यकीय शिबीर पार पडले.या वैद्यकीय शिबीरात २५० रहिवाशांनी सहभाग नोंदवून त्याचा लाभ घेतला.
शिबीरात रक्तदाब, शुगर,पीएफटी, एसिजी,ईएनटी टेस्ट तसेच डोळे तपासणी करून मोफत औषधे आणि गरजूंना १७५ चष्मे मोफत वाटण्यात आले.शिबीराला आर. सी.एफ च्या श्रीमती नजहत शेख(संचालिका,वित्त),श्री.निरंजन सोनक(कार्यकारी संचालक,वाणिज्य),श्रीमती रेखा देवाडिगा (उपमहाव्यवस्थापक, मेडिकल),सौ.भाग्यश्री कापुरे (समुपदेशिका ,आर.सी.एफ),श्री.हेमंत पाटील(समाजसेवक) हे मान्यवर उपस्थित होते.शिबीरात श्री.राजकुमार घाडी (वैद्यकीय समाजसेवक) यांची टीम तसेच तज्ञ डॉ.श्री.विनीत गायकवाड,डॉ. रजनीश कुमार, डॉ. निशिगंधा नेहते,डॉ.अविनाश सिंह उपस्थित होते.
शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर यांच्या सहित सचिव श्री.प्रदीप गावंड,उपाध्यक्ष रमेश पाटील, श्री.हनुमंता चव्हाण,सौ.निलम गावंड,श्री.वैभव घरत,श्री.प्रकाश शेजवळ,श्री.रहीम शेख, श्री.मंदार भोपी,श्री.डी.एम मिश्रा,श्री.सचिन राखाडे,श्री.पुरु पाटणसांगवीकर यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्नेहा नानिवडेकर यांनी केले. तर कु.सुशिल मेस्त्री यांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडली.
पंचरत्न मित्र मंडळ, चेंबूर आर सी एफ तर्फे गेल्या १८ वर्षाहून अधिक काळात समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत आहे. मंडळाचे कार्यतत्पर अध्यक्ष गुणवंत कामगार श्री.अशोक भोईर व सहकारी प्रामुख्याने आदिवासी,अंध विकलांग , वृद्धाश्रम यांना सर्वतोपरी सहाय्य करते.गरीब गरजूंसाठी निशुल्क मेडीकल कॅम्प ,नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अन्नधान्य,कपडे,गृहोपयोगी वस्तू,औषधे,वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे,नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.समाजाला मदतीचा हात देत गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष - अशोक भोईर,सचिव प्रदीप गावंड,खजिनदार -सचिन साळुंखे, सहसचिव वैभव घरत,सौ.स्नेहा नानीवडेकर,सल्लागार हनुमंता चव्हाण,सचिन डेरे, संदीप पाटील,सौ.नीलम गावंड, सतीश कुंभार, सुशील मेस्त्री,डी. निंबाळकर,मंडळ छाया चित्रकार मॅथ्यू डिसोझा आणि सर्व महिला -पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष परिश्रममुळेच गेली १८ वर्ष सातत्याने कार्यक्रम यशस्वी होतात असं मत यानिमित्ताने मंडळ अध्यक्ष अशोक भोईर यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा