आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

कोकण सुपुत्र माननीय श्री डॉ मिलिंद बच्चू आंबेरकर राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार २०२४ ने सन्मानित

मुंबई(प्रतिनिधी):  प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो आणि माननीय श्री डॉ मिलिंद बच्चू आंबेरकर यांनी केलेल्या कार्याची दखल प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा नाट्य मंडळ महाराष्ट्र अध्यक्ष सौ प्रेरणा उर्फ दीप्ती वैभव कुलकर्णी आणि टीमने घेतली आणि या वर्षीचा राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आलं. रविवार दिनांक १५ डिसेंबर रोजी श्री बल्लाळेश्वर मंगल कार्यालय, भारत कॉलेज रोड, हेंद्रे पाडा- बदलापूर( पश्चिम) येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या  पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका/अध्यक्षा सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य तपासी अधिकारी अँटिपायरसी मुंबई सेलचे रामजीत (जीतू) गुप्ता,मा.ऍड.मोहन शुक्ला(अध्यक्ष औदुंबर साहित्य मंच व अध्यक्ष रेक्रिशन टेनिस क्लब एरंडोल जळगाव),पुणे माळीण , गाव उद्धारचे मच्छिन्द्रनाथ रामचंद्र झंजारे, सौ.दिपाली शिरापूरे,(सुप्रसिद्ध समाजसेविका ),प्रशांत पेंधे( सी. ई.ओ.पार्थ गारमेंट तंत्रस्नेही शिक्षक (शैक्षणिक क्रांती) ठाणे, सेवक नागवंशी( राष्ट्रीय सरपंच दक्षिण झोन अध्यक्ष, सुप्रसिद्धध समाजसेवक, उद्योजक),मोहन कदम (सुप्रसिद्ध समाजसेवक, प्रसिद्ध पत्रकार),दिलीप नारकर (बृहमुंबई होमगार्ड विभाग),अविनाश म्हात्रे(अध्यक्ष दीनदयाल कुष्ठरोग संस्था, अध्यक्ष),सौ.प्रियंवंदा तांबोटकर (आर.एस.पी.ऑफिसर नवी मुंबई),संजय हिरु घुडे ( ठाणे ग्रामीण पोलीस दल 1998),राजेश भांगे(उद्योजक,समाजसेवक),लेखा तोरसकर (जाणता राजा अभिनेत्री, समाजसेविका),लोकेश पाटील ( सामाजिक कार्यकर्ता ) आदी मान्यवर उपस्थित होते.
    मिलिंद फाउंडेशन चा सदस्या माननीय सौ मिताली आंबेरकर यांनाही राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट समाजसेविका २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .तसेच मिलिंद फाउंडेशनचे सचिव श्री सिद्धेश रमेश रावळ आणि खजिनदार सौ प्रणिता परशुराम गवंडे यांनाही पुरस्कार जाहीर झालेत. माननीय श्री. डॉ मिलिंद आंबेरकर यांना समाजसेवेचे बाळकडू  त्यांच्या घरातूनच म्हणजेच त्यांचे वडील श्री बच्चू मुकुंद आंबेरकर (संस्थापक -उपाध्यक्ष) आणि आई सौ वैशाली बच्चू आंबेरकर (संचालिका) यांच्याकडून मिळाले.तसेच मिलिंद फाउंडेशन संचालक श्री मुकुंद आंबेरकर, श्री परशुराम प्रभाकर गवंडे आणि सौ सुषमा सिद्धेश रावळ यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले. राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल  समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर आशीर्वाद व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: