आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा मार्ग ( दिंडोरी प्रणित ) मार्गातील घणसोली केंद्रामध्ये दत्तजन्मोत्सव भक्तीभावाने साजरा

नवी मुंबई (दिव्या पाटील) श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा मार्ग ( दिंडोरी प्रणित ) मार्गातील घणसोली केंद्रामध्ये दत्त जयंती सप्ताहानिमित्त २०४ महिला व पुरुषांच्या माध्यमातून सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा आनंदात पार पडला. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील सर्व सेवेकऱ्यांनी हा सोहळा उत्सहात साजरा केला. गेल्या ८ ते ९ वर्षांपासून स्वामी सेवेकरी रमेश नारायण पाटिल यांच्या घणसोली येथील निवासस्थानी श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह पार पडतो. यंदा ९ ते १५ डिसेंबर या कालावधीत ह्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
    सप्ताह कालावधीत दररोज सकाळी ५ वाजता तसेच सकाळी ८ वाजता दोन बॅचच्या माध्यमातून श्री गुरुचरित्र सामूहिक पारायण तसेच सायंकाळी ८ वाजता सामूहिक श्री विष्णुसहस्त्रनाम पार पडत असे. सेवेकऱ्यांनी नियम व शिस्त पाळून भक्तिभावाने पारायण पार पडले. 
१५ डिसेंबर रोजी श्री दत्तजन्मोत्सव सोहळा पार पडला. त्याचप्रमाणे १६ डिसेंबर रोजी महाप्रसादचे आयोजन करण्यात आले असून जवळ जवळ एक हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सेवकऱ्यांना मोलाचे संदेश देऊन स्वामी भक्तीचा मार्ग सर्वांना समजावून सांगण्याकरिता पनवेल येथील मठाधिपती सुधाकर घरत ह्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती दाखवली. सर्व सेवेकऱ्यांच्या सहकार्यामुळे हा सोहळा आनंदात आणि उत्साहात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: