आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

आंगवली सोमेश्वर ग्राम देवता मंदिर येथे आमदार श्री.शेखरजी निकम यांच्या धर्मपत्नी सौ.पूजा निकम यांची भेट

मुंबई (शांताराम गुडेकर )  घटस्थापनेपासून दसरा सणापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु. पो.आंगवली येथील सोमेश्वर या ग्राम मंदिरात नवरात्र उत्सव सोहळा दर वर्षीप्रमाणे चालू वर्षी संपन्न होत आहे.यावेळी सर्व लोकं एकत्र येऊन गुण्या गोविंदाने समरस होतात, व आनंद घेतात.प्रत्येक दिवशी पूजा,आरती,गरबा नृत्य, विविध कार्यक्रम आदीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
           आंगवली सोमेश्वर मंदिर येथे स्थापण झालेली ग्रामदेवतेच्या पालखीला काल (दि. ७ ऑक्टोबर २०२४)संगमेश्वर - चिपळूण विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.शेखरजी निकम यांच्या धर्मपत्नी सौ.पूजा निकम यांनी भेट देऊन दर्शन घेतले.यावेळी आंगवली ग्रामदेवता सोमेश्वर यांच्यामार्फत गावाच्यावतीने सौ. पूजा निकम यांचा सत्कार करण्यात आला.सौ. निकम यांनी यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.ग्रामस्थ यांनी गरबा उत्सव चांगल्या प्रकारे आयोजन केल्याबद्दल सोमेश्वर मंदिर मानकरी सहित सर्व ग्रामस्थ यांना तसेच उत्सव आयोजक यांना धन्यवाद देत सर्व कार्यक्रमला शुभेच्छा दिल्या.या ठिकाणी रोज गरबा आणि भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे.काही विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गावाच्यावतीने आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व भक्त जणांनी प्रसाद व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी आंगवली गावचे सर्व ग्रामस्थांच्याकडून विनंती करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साई परिवार सेवाभावी ट्रस्टतर्फे मान - विक्रमगड आश्रम शाळेत मुलांना शैक्षणिक साहित्य , खाऊ वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम ): आपला समाज पुढे येण्यासाठी शिक्षणात मागे न राहण्यासाठी व आपल्यावर अस...