अलिबाग प्रतिनिधी दिनेश तुरे यांजकडून : - कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, मुक्काम - फणसापुर , तालुका - अलिबाग, जिल्हा - रायगड येथील आगरी समाजाच्या, मनमिळावू स्वभावाच्या , प्रेमळ - मायाळू व अध्यात्मिक व्यक्तीमत्व, समर्थ बैठक परिवाराच्या भक्तगण , सर्वांच्या लाडक्या ज्येष्ठ समाजसेविका कै. तारामती हरिभाऊ पाटील यांचे सोमवार दिनांक ३०/०९/२०२४ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी अकस्मात दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुलगी - अंजु , नात - अश्विनी , नातु - अतिष, बहीण - विद्या , भाऊ - हरिश्चंद्र , दिवंगत भाऊ - भास्कर, दिवंगत बहिणी - सीता व उज्वला , सुन - नातवंडे , पाटील कुटुंबीय असा विशाल परिवार आहे, मृद्भभाषी समाजसेविका कै. तारामती हरिभाऊ पाटील या समाजसेवेत सतत रममाण असायच्या, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा , तोची देव पहावा. लोकांच्या सुख - दुःखात त्या नेहमी धावून यायच्या, त्यांच्या परोपकारी वृत्तीने त्यांनी जनमानसात मानचे स्थान निर्माण केले होते, त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामूळेच त्यांच्या अंत्यविधी समयी सामाजिक - राजकीय व अध्यात्मिक विभागातील जनसमुदाय मोठ्या संख्येने फणसापुर स्मशानभूमीत त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होता व हीच त्यांच्या सामाजिक व अध्यात्मिक कार्याची पोहचपावती होय.
आयुष्यभर काबाड कष्ट करून त्यांनी मोठा संघर्ष करून कुटुंबाचा डोलारा समर्थपणे सांभाळला होता. अजातशत्रू असे प्रेमळ व्यक्तीमत्व हरपल्यामुळे गावात व विभागात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचे दिवसकार्य रविवार दिनांक १३/१०/२०२४ रोजी त्यांच्या मुक्काम : फणसापुर, अलिबाग - रायगड या निवासस्थानी सकाळी
८ .०० वाजता होणार आहे , असे पाटील कुटुंबियांकडून कळविण्यात आले आहे.
आका, ऐसा देह लाभावा, देहाची चंदन व्हावा, शरीर लोप पावले तरी तुमच्या प्रेमळ व मायेच्या आठवणींचा तुमच्या कार्याचा व कर्तृत्वाचा हा सुगंध सतत दरवळत रहावा हेच मागणे विश्वविधात्याकडे, आका जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुमची उणीव जाणवणार ! आका, तुमच्या प्रेमळ मायेच्या आठवणीने कंठ दाटून येत आहे , या मायेच्या व्यथित करतात त्या आठवणी ह्या सदैव स्मरणात राहतील! आका आपल्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रध्दांजली! भावपूर्ण श्रद्धांजली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा