मुंबई: शिवडी विधानसभा मतदार संघातील विभागामध्ये गेल्या २ महिन्यांपासून प्रचंड पाणी टंचाई होत असून विभाागातील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये जलविभागाच्या अधिकारी यांच्या सोबत बैठक झाली होती. त्याचप्रमाणे पाणीटंचाई संदर्भात जलअधिकारी यांच्या सोबत वरळी हब येथे बैठक घेतली असता. ८ दिवसामध्ये पाणी पुरवठा सुरळित होईल असे अधिकारी यांनी आश्वासन दिले. प्रभागनिहाय पाणी टंचाई संदर्भात एफ/दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी व तपासणी केली असता लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळित करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले. परंतु गेले २ महिने यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे. रहिवाशांच्या अनेक तकारी लेखी स्वरूपात आले असून त्या तकारी जलविभाग, फ/दक्षिण विभागाकडे पाठविण्यात आल्या असता आश्वासनाशिवाय काही कार्यवाही केलेली नाही.
रहिवाशांच्या आग्रहाखातर या पाणीटंचाई प्रश्नी निर्णयात्मक कार्यवाही करण्याकरिता मंगळवार दि. ०८ ऑक्टोंबर २०२४ रोजी स. १०.०० वा., कामगार मैदान, के.ई.एम. रूग्णालयाच्या समोर, परळ येथून महानगरपालिका, एफ/दक्षिण विभाग कार्यालयावर 'हंडा मोर्चा' नेण्यात येणार असल्याचे आमदार अजय चौधरी यांनी कळवले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा