आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

उपक्रमशील शिक्षक श्याम माळी यांना "आदर्श शिक्षक " पुरस्कार

ठाणे (संदेश भोईर)- मुलांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत, शिक्षणक्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करुन विद्यार्थी घडवण्याचे काम अविरतपणे करणारे जिल्हा परिषद शाळा जावसई, केंद्र चिखलोली शाळेचे गुणी शिक्षक कवी श्याम राघोजी माळी यांना शिक्षण विभाग पंचायत समिती अंबरनाथ यांच्याकडून शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
     यावेळी मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे साहेब, अंबरनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी परदेशी साहेब, गट शिक्षणाधिकारी जतकर साहेब इत्यादी मान्यवर उपस्थीत होते. 
शिक्षक कवी श्याम माळी हे प्रसिद्ध कवी साहित्यिक असून यांचे 'थांबला तो संपला' आणि 'खाऊची शाळा' हे बाल कविता संग्रह आणि 'आमचा आगरी दादूस', ' आगरवाट' हे बोलीभाषेतील साहित्य प्रकाशित झाले आहे.
शिक्षक कवी श्याम माळी यांचे ह्या आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साई परिवार सेवाभावी ट्रस्टतर्फे मान - विक्रमगड आश्रम शाळेत मुलांना शैक्षणिक साहित्य , खाऊ वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम ): आपला समाज पुढे येण्यासाठी शिक्षणात मागे न राहण्यासाठी व आपल्यावर अस...