आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

सर्वपित्री दर्श अमावास्या एक विशाल दृष्टीकोन...

आज आपल्या पुर्वजांची आठवण काढण्याचा दिवस.त्यांचे श्रद्धेने स्मरण करण्याचा दिवस!
   👉पूर्वज कोण? 
माता-पिता,आजी-आजोबा,संत,ऋषीमूनी,महापुरूष,क्रांतिवीर यासर्वांची त्यांची लेकरे या नात्याने आज स्मरण करायचं.
   👉ज्यांनी जन्म दिला,सांभाळलं,लहानाचे मोठे केले.असे आपले माता-पिता.....!
 👉 आपल्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या,त्रास सहन केला.असे आजी-आजोबा...!
   👉जीवन कसं जगावं? हे शिकविलं,
संस्कार दिले.असे आपले संत....!
   👉आम्ही पशूसारखे जीवन जगत असूनही आमच्याकडे ज्यांनी माणूस म्हणून बघीतले आणि निःस्वार्थ प्रेम केले.पशू सृष्टीतून मनुष्य सृष्टीत आणले.असे ऋषीमूनी....!
     👉विचार आणि प्रेम देऊनी माणसासारखं जगायला लावलं,गीतेची ओळख करून दिली,अतूट ज्ञान,निष्काम कर्मयोग आणि शास्त्रोक्त भक्ती ज्यांनी समजावली असे महापुरूष.....! 
 👉समस्त भारतीयांच्या संरक्षणासाठी ज्यांनी देह समर्पित केला,ज्यांनी देहाच्या आहुत्या दिल्या.असे क्रांतिवीर,...!
     यासर्वांच्या आठवणींचा आज दिवस म्हणजेच 'श्राद्ध'.
     आपण आज सर्वांचं अंतःकरण पूर्वक स्मरण करुया आणि संकल्प करुया कि,"आमच्यासाठी तुम्ही केलेले कष्ट,समर्पण आम्ही वाया घालविणार नाही."
    सर्वांना 'सर्वपित्री दर्श अमावास्येच्या" हार्दिक शुभेच्छा.
---------------------------------
  ✍️नवनाथ ठाकुर-खिडकाळी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण

मुंबई (उदय वाघवणकर) - मराठीतून शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्य...