आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १६ जुलै, २०२६

जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण

मुंबई (उदय वाघवणकर) - मराठीतून शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्ये एका लहानशा खोलीत सुरू केलेल्या परब क्लास मुळे अनेक विद्यार्थी घडले.आणि आज ते विविध क्षेत्रात उच्च पदावर आपल्या सेवा बजावत आहेत.आणि यामागील खरा दीपस्तंभ कोण असेल तर अंकुश परब सर.शिक्षण हा व्यवसाय नसून ती एक पवित्र सेवा आहे या विचारातून सुरू असलेल्या या क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या फी चा प्रश्न कधीच महत्त्वाचा मानला नाही.आदर्श मानला तो शिक्षणाचा.विद्यार्थी घडवण्याचा त्यांच्या या कार्यात त्यांचे सख्खे बंधू लवू परब यांनी मोलाची साथ दिली.अंकुश सरांच्या अकाली आणि आकस्मिक निधनाने शिक्षण क्षेत्रातील माणुसकीचा एक दीपस्तंभ हरपल्याची भावना त्यावेळी निर्माण झाली.मात्र त्याही परिस्थितीमध्ये सरांच्या अंगी असलेला दातृत्वाचा वसा त्यांचे विद्यार्थी,स्वतः सरांच्या सुविद्य पत्नी जय हिंद महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या डॉ.संगीता अंकुश परब यांनी पुढाकार घेऊन अंकुश सर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अविरत सन २०२० पासून सुरू ठेवला आहे.या उपक्रमाअंतर्गत समाजातील दुर्लक्षित घटकांना घेरून प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांना हवी असलेली मदत प्रतिष्ठानच्या वतीने दिली जाते.यंदाही १५ जुलै रोजी किल्ले घोडबंदर,काशीगाव या दुर्गम भागात असलेल्या मीरा भाईंदर मनपा शाळेला भेट देऊन शालेय वस्तू, जॉमेट्रिक बॉक्स,माहितीपूर्ण तक्ते,शाळेस आवश्यक असलेला ब्ल्यू-टूथ स्पीकर इत्यादी वस्तू वितरित करण्यात आल्या.
    दानाचा हा वारसा असाच अविरत सुरू राहील आणि त्यातून अंकुश सरांच्या पवित्र आठवणींना उजाळा मिळेल अशा भावना संस्थापक डॉ.संगीता अंकुश परब यांनी आपल्या मनोगतात सांगितले तर अत्यंत प्रतीकुल परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थ्यां ना घडविले ले अंकुश सर हे खरोखर शिक्षण क्षेत्रात माणुसकीचे खरे दीप स्तंभ असल्याची भावना माजी विद्यार्थी अनिल म्हसकर यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हिंद कॉलेजचे डॉ बाळकृष्ण सर,विद्यार्थी,अंकुश सर प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री लवू परब सर.श्री विवेक व वनिता सावंत,श्री अनिल व क्षमा म्हसकर,अरविंद जाधव हे उपस्थित होते.शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता अहिरे व शाळेच्या विश्वस्तांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कार्यक्रमांचे यश प्रतिबिंबित करीत होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण

मुंबई (उदय वाघवणकर) - मराठीतून शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्य...