मुंबई: सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई, यांच्या वतीने, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुळगाव असलेली व ज्या मुला/मुलीनी मुंबई शहर व उपनगर परिसरातील शाळा-कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना चालू वर्षी ( सन २०२३-२४) मध्ये इ. १० वी च्या परीक्षेत ८० टक्के, १२ वीत ७५ टक्के {विज्ञान व वाणिज्य शाखा), ७० टक्के ( कला शाखा ) व त्याहून अधिक गुण संपादन केले आहेत, विविध विषयाच्या कॉलेजच्या पदवी-पदविका परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थांना, संस्थेच्या वार्षिक स्नेह-संमेलनात रोख रक्कमेची पारितोषिके, सन्मान चिन्हे, प्रशस्तीपत्रके देऊन गौरव करण्यात येणार आहे. तरी वरील प्रमाणे यश संपादन केलेल्या विद्यार्थांनी आपल्या गुण पत्रिकेची छायांकित प्रत, संपूर्ण नाव, मुंबईतील पत्ता, गावचचा पत्ता, टेलीफोन क्र /मोबाईल क्र. सह दि. ३० ऑक्टोबर २०२४ पूर्वी, सावंतवाडी संस्थान मराठा समाज,मुंबई, स्टार मॉल, ३रा मजला, न. चि. केळकर मार्ग, दादर (पाश्चिम), मुंबई ४०००२८ या पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहिती साठी संपर्क ( सोमवार सोडून ) ०२२-२४३०३५८५ ( सायं.४ ते ७.००) करावा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण
मुंबई (उदय वाघवणकर) - मराठीतून शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्य...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा